solapur crime news
solapur crime news saam tv
महाराष्ट्र

Solapur: भीमा काळे मृत्यू प्रकरणी पोलीस निरीक्षकासह ७ जणांवर गुन्हा दाखल

विश्वभूषण लिमये

सोलापूर : पोलीस कोठडीत (police custody) गुन्ह्याचा तपास करत असताना आजारी असलेल्या भीमा काळेचा (bhima kale) उपचारादरम्यान सोलापुरातील शासकीय रुग्णालयात (solapur general hospital) मृत्यू झाल्याप्रकरणी तत्कालीन (solapur police) पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक यांच्यासह सात जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात (vijapur naka police station) गुन्हा दाखल झाला आहे. (solapur latest marathi news)

पाेलिसांना दिलेल्या तक्रारीत सहायक पोलीस निरीक्षकासह सहा जणांनी गुन्हा कबूल करण्यासाठी मारहाण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील (udaysinh patil), सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ (shitalkumar velhal), हवालदार श्रीरंग खांडेकर (shreerang khandekar), पोलीस नाईक शिवानंद भीमदे, पोलीस नाईक अंबादास गड्डम, पोलीस शिपाई आतिश पाटील, पोलीस नाईक लक्ष्मण राठोड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

भीमा काळे हा एका गुन्ह्यात जिल्हा कारागृहात होता. विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी २२ सप्टेंबर २०११ रोजी भीमा काळे याला कारागृहातून वर्ग करून ताब्यात घेतले होते. न्यायालयाने भीमाला २२ ते २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली हाेती. पोलीस कोठडीत असताना भीमा काळे याला सर्दी, ताप, खोकला आणि उलट्या होत होत्या. त्याच्या पायाला कशाचा तरी संसर्ग झाल्याने सूज आली होती. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा तीन ऑक्टोबरला मृत्यू झाला.

या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात (सीआरपीसी कलम १७४ प्रमाणे) मयत म्हणून नोंद करण्यात आली होती. दरम्यान तक्रारीनंतर सात जणांविरुद्ध वैद्यकीय मदत न पुरवता त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी (भादंवि कलम ३०४, ३३०, १६६, ३४ प्रमाणे) गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभाग (crime branch) भरारी पथकाचे डीवायएसपी जी. व्ही. दिघावकर करीत आहेत.

याप्रकरणात आरोपी भीमा काळे याला गुन्हा कबूल करण्यासाठी पोलिसांनी पोलीस कोठडीत मारहाण केल्याची फिर्याद आहे. पोलीस ठाणे आवारात प्रत्येक कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे लावून सर्व जतन करण्याची आवश्यकता असताना या प्रकारांत प्रगटिकरण कक्षात सीसीटीव्ही नसल्याचं दिसून आलं. त्यामुळे पोलिसांनीच पोलिसांच्या विरोधात फिर्याद देत गुन्हा नोंद केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnvis News | बैल आणि बोटं, पालघरमध्ये फडणवीस आणि ठाकूर आमनेसामने

Diabetes Control Tips: रोजच्या 'या' सवयी बदला मधुमेहावर राहील नियंत्रण

Sanjay Raut : होर्डिंग कोसळून अनेकांचा बळी, त्याच घाटकोपरमध्ये PM मोदींचा रोड शो; संजय राऊतांची टीका

Ratnagiri Crime : काेकणातील श्रमिक सहकारी पतपेढीवर दराेडा, दीड कोटींचे सोने लंपास; श्वान पथक दाखल

Lok Sabha Election 2024: मोठी बातमी! ऐन निवडणुकीत रवींद्र वायकरांना निवडणूक आयोगाची नोटीस, काय आहे नेमकं कारण?

SCROLL FOR NEXT