Bharat Gogawale Aghori Pooja Saam Tv Youtube
महाराष्ट्र

Bharat Gogawale : महाराष्ट्राचं 'अघोरी' राजकारण, भरत गोगावलेंच्या नव्या व्हिडीओनं खळबळ, मित्र पक्षाकडूनच अघोरी पूजा उघड

Bharat Gogawale Aghori Pooja New Video : पुन्हा एकदा शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावले यांचा अघोरी पुजा करतानाचा व्हिडिओ राष्ट्रवादीच्या नेत्यांनं पोस्ट केलाय. मात्र ही पूजा कशासाठी केली गेली? ती कोणत्या देवीची होती? आणि त्यावर गोगावलेंनी काय प्रतिक्रिया दिलीय? पाहूयात...

Bharat Mohalkar

शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंचा आणखी एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आलाय....विशेष म्हणजे सत्ताधारी मित्र पक्षाच्या नेत्याकडूनच गोगावलेंचा हा व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाणांनी हा व्हिडीओ ट्विट केलाय...गोगावलेंचा यापूर्वी पूजेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र आताच्या य़ा व्हिडिओत गोगावले पालकमंत्रिपदासाठी अघोरी पूजा करत असून हा कायद्यानं गुन्हा असल्याचा आरोप सूरज चव्हाण यांनी केलाय.

मंत्री भरत गोगावलेंच्या वादग्रस्त व्हिडिओवरून आता ठाकरेसेनेनं शिंदेसेनेला टार्गेट केलंय. शिंदेसेनेचे नेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावरून घालवण्यासाठी अघोरी पूजा करत असल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय. ते जसे मंत्र्यांचे पीए तपासून घेत आहेत, तसे त्यांनी मंत्री सुद्धा तपासून घेतले पाहिजे.. असा टोलाही राऊतांनी लगावलाय. दरम्यान भरत गोगावलेंनी अघोरी पूजा कळत नसल्याचं सांगत विरोधकांचे आरोप फेटाळून लावलेत.

यापूर्वी ठाकरे गटानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही अघोरी पुजेचे आरोप केले होते. मात्र यावेळी गोगावलेंचा नवा व्हिडिओ मित्रपक्ष राष्ट्रवादीनेच उघड केलाय. त्यामुळे महायुतीत कशाप्रकारे राजकारण सुरु आहे हेच यातून समोर आलंय. राजयगडच्या पालकमंत्री पदावरुन शिंदे सेना आणि राष्ट्रवादीतं संघर्ष सुरु आहे. याच पार्श्वभूमिवर पालकमंत्री पद ते थेट मुख्यमंत्री पदासाठी अघोरी विद्येचा वापर होत असल्याचा आरोप अनेक सवाल निर्माण करतोय. राज्यात जादूटोणा विरोधी कायदा असूनही राजकीय नेत्यांकडून अशा अघोरी पुजेला प्रोत्साहन दिले जात असेल तर कायद्याची अंमलबजावणी कशी होणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Param Sundari OTT Release : थिएटर गाजवल्यानंतर सिद्धार्थ-जान्हवीचा 'परम सुंदरी' चित्रपट 'या' OTT प्लॅटफॉर्मवर येणार

Manoj Jarange Health Update : दुसऱ्या दिवशीच प्रकृती खालावत चालली, बोलता बोलता जरांगेंनी दिली प्रकृतीची अपडेट

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे आज दुपारी दरे गावात जाणार

Manoj Jarange Patil Protest Live Updates : अजित पवारांच्या विश्वासू शिलेदारांचा जरांगेंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा

Nashik Crime : हाणामारीत जखमी राहुल धोत्रेचा उपचारादरम्यान मृत्यू; खुनाचा गुन्हा दाखल होताच भाजपचे पदाधिकारी फरार

SCROLL FOR NEXT