Bhandara Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Government Job Scam : सरकारी नोकरीचं आमिष, १५ लाख घेतले; बनावट जॉइनिंग लेटरही दिलं, धक्कादायक प्रकार उघड

Bhandara Crime News : भंडाऱ्यात आरोग्य सेवक पदासाठी प्रति उमेदवार १५ लाख रुपये घेऊन बनावट जॉइनिंग लेटर देणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

भंडारा जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात बनावट भरती रॅकेटचा पर्दाफाश

प्रति उमेदवार १५ लाख रुपये घेऊन बनावट जॉइनिंग लेटर देण्यात आले

तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अमरावती पोलिसांनी छापा टाकून बनावट शिक्के आणि दस्तऐवज जप्त केले

भंडाऱ्यातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवक या पदावर नियुक्ती करण्याकरिता प्रति उमेदवार १५ लाख रुपये घेतल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. धक्कदायक म्हणजे तरुणांना बनावट जॉइनिंग लेटर देण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेतले असून या प्रकरणात अन्य काही जण सहभागी असल्याचं समोर आलं आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवक या पदावर नियुक्ती करण्याकरिता विजय यावलकर आणि त्यांच्यासह असलेल्या रॅकेटमधील अन्य यांनी प्रति उमेदवार १५लाख रुपये घेतले. अमरावतीच्या दर्यापूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावातील तरुणांकडून ही रक्कम घेतल्यानंतर त्याला आरोग्य विभागात नियुक्त करण्यात आल्याचे बनावट जॉइनिंग लेटर देण्यात आले.

त्यानंतर जेव्हा तरुण भंडाऱ्यात नोकरीवर रुजू होण्यास आला तेव्हा त्याची फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. यामुळं त्यांनी अमरावतीच्या दर्यापूर पोलीस ठाण्यात या रॅकेट विरोधात तक्रार दाखल केली होती. या अनुषंगानं दर्यापूर पोलिसांचं एक पथक या आरोपींच्या मागावर होतं. सापळा रचून या पथकानं विजय यावलकर यांच्याशी संपर्क साधून त्याला शिताफिनं पुण्याच्या अन्य एका आरोपीसह भंडाऱ्यातून अटक केली.

या कारवाईमुळे भंडारा जिल्हा परिषद प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागातील आरोग्य सेवक या रिक्त पदांवर नोकरी लावून देण्याच्या नावावर तरुणांची लाखो रुपयांनी फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा अमरावती पोलिसांनी भंडाऱ्यात पर्दाफाश केला. अटक करण्यात आलेल्यांमध्ये भंडारा आणि पुण्यातील दोन तरुणांचा समावेश आहे.

आरोपींकडून आरोग्य सेवक पदाचे बनावट जॉइनिंग लेटर आणि त्यासाठी लागणाऱ्या अधिकाऱ्याच्या पदाचे बनावट सिक्के या पोलीस पथकानं ताब्यात घेतल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. विजय यावलकर असं भंडाऱ्यातून अटक केलेल्या व्यक्तीचं नाव असून पुण्याच्या व्यक्तीचं नाव तपास अधिकाऱ्यांनी सांगण्यास नकार दिला. या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा समावेश असून त्यांनाही लवकर ताब्यात घेण्यात येईल, असं अमरावती पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

स्थानिक भाजपला शिंदेसेना नको, भाजपचे मंडळाध्यक्ष इरेला पेटले

SCROLL FOR NEXT