Women's World Cup : वर्ल्डकप स्पर्धेबाबत मोठी अपडेट, वेळापत्रकच बदललं; महाराष्ट्राला मोठा मान
Sports NewsSaam Tv

Women's World Cup : वर्ल्डकप स्पर्धेबाबत मोठी अपडेट, वेळापत्रकच बदललं; महाराष्ट्राला मोठा मान

Sports News : आयपीएल २०२५ च्या चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. महिला विश्वचषक २०२५ चे सामने बंगळुरूतून हलवून नवी मुंबईत खेळवले जाणार आहेत.
Published on
Summary
  • आयसीसीने महिला विश्वचषकातील पाच सामने बंगळुरूतून नवी मुंबईत हलवले.

  • आयपीएल २०२५ विजयोत्सवातील चेंगराचेंगरीनंतर चिन्नास्वामी स्टेडियमला असुरक्षित ठरवले.

  • ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा आठ संघांमध्ये खेळवली जाणार.

  • भारताचे दोन महत्त्वाचे सामने आता नवी मुंबईत खेळले जाणार आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शुक्रवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली असून, आगामी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांच्या ठिकाणात मोठा बदल करण्यात आला आहे. याअंतर्गत, मूळतः बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर नियोजित असलेले पाच महत्त्वाचे सामने ज्यामध्ये उद्घाटन सामना, उपांत्य फेरी तसेच अंतिम सामन्याचाही समावेश होता हे आता नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये हलविण्यात आले आहेत.

हा निर्णय का घेण्यात आला ?

गेल्या जून महिन्यात आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विजय सोहळ्यात चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक लोक जखमी झाले. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती जॉन मायकल डी’कुन्हा आयोगाने स्टेडियमला मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या कार्यक्रमांसाठी "मूलभूतपणे असुरक्षित" ठरवले. आयोगाच्या निष्कर्षांना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर कर्नाटक क्रिकेट संघटनेला पोलिसांकडून आवश्यक परवानग्या मिळविण्यात अपयश आले, आणि परिणामी आयसीसीला पर्यायी ठिकाण शोधावे लागले.

Women's World Cup : वर्ल्डकप स्पर्धेबाबत मोठी अपडेट, वेळापत्रकच बदललं; महाराष्ट्राला मोठा मान
Sport Success Story: जिद्द, मेहनतीनं मिळतं यश; वाचा, स्क्वॉश खेळात फिनिक्ससारखी उंच भरारी घेणाऱ्या वसुंधरा नांगरेची कहाणी

आयसीसीने अधिकृत निवेदनात म्हटले की, “एम. चिन्नास्वामी स्टेडियम अनुपलब्ध असल्यामुळे नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम स्पर्धेच्या पाच स्थळांपैकी एक ठरणार आहे.” जरी यावर अधिक भाष्य करण्याचे टाळले गेले, तरी बीसीसीआयने या निर्णयाला मान्यता दिली आहे.

Women's World Cup : वर्ल्डकप स्पर्धेबाबत मोठी अपडेट, वेळापत्रकच बदललं; महाराष्ट्राला मोठा मान
Top 8 Sports Based Movies: भारतातील प्रसिद्ध खेळांवर आधारित 'हे' स्पोर्ट्स चित्रपट पाहाच

कोणते सामने कुठे खेळवले जाणार ?

३० सप्टेंबरपासून २ नोव्हेंबरपर्यंत चालणारी ही स्पर्धा भारतासह आठ संघांमध्ये होणार आहे. बंगळुरूमध्ये नियोजित भारत-श्रीलंका उद्घाटन सामना गुवाहाटीला हलविण्यात आला असून, ३० सप्टेंबर रोजी तो खेळवला जाईल. त्याचबरोबर इंग्लंड-दक्षिण आफ्रिका (३ ऑक्टोबर), भारत-बांगलादेश (२६ ऑक्टोबर), उपांत्य फेरी (३० ऑक्टोबर) आणि अंतिम सामना (२ नोव्हेंबर) हे सर्व सामने नवी मुंबईत होतील. विशेष म्हणजे, आयसीसीच्या हायब्रिड मॉडेलनुसार जर पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचला, तर अंतिम सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर हलवला जाईल.

Women's World Cup : वर्ल्डकप स्पर्धेबाबत मोठी अपडेट, वेळापत्रकच बदललं; महाराष्ट्राला मोठा मान
TVS Sport: फक्त २ लिटर पेट्रोलमध्ये गाठता येणार मुंबईहुन पुणे; TVSची बाईक देते दमदार मायलेज

भारताचा कार्यक्रमही या बदलामुळे काही प्रमाणात फेरबदल करण्यात आला आहे. आता भारत आपले दोन ग्रुप सामन्यांचे आयोजन नवी मुंबईत करणार आहे. त्यात २३ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध आणि २६ ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्धचे सामने असतील. गुवाहाटी, कोलंबो, विशाखापट्टणम आणि इंदूर ही उर्वरित सामने होणारी स्थळे असतील.

Women's World Cup : वर्ल्डकप स्पर्धेबाबत मोठी अपडेट, वेळापत्रकच बदललं; महाराष्ट्राला मोठा मान
Nagpur Company Sport News | नागपुरातील कंपनी स्फोटात 9 कामगारांचा मृत्यू

जय शाह यांच्याकडून आनंद व्यक्त

नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम गेल्या काही वर्षांत महिला क्रिकेटसाठी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणून उदयास आले आहे. महिला प्रीमियर लीगसह अनेक द्विपक्षीय मालिका येथे यशस्वीपणे पार पडल्या असून, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी या बदलाचे स्वागत करताना नवी मुंबईची प्रशंसा केली.

Women's World Cup : वर्ल्डकप स्पर्धेबाबत मोठी अपडेट, वेळापत्रकच बदललं; महाराष्ट्राला मोठा मान
#Shorts : Sports News | आज भारत VS दक्षिण आफ्रिका लढत!

या बदलामुळे महाराष्ट्राला पुन्हा एकदा जागतिक स्तरावरील क्रिकेट महोत्सवाचे यजमानपद लाभले आहे. महिला विश्वचषकातील महत्त्वाचे सामने आता मुंबई-पुणे परिसरातील चाहत्यांना पाहायला मिळणार असून, स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य सरकार, बीसीसीआय आणि स्थानिक संघटना सज्ज झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com