TVS Sport: फक्त २ लिटर पेट्रोलमध्ये गाठता येणार मुंबईहुन पुणे; TVSची बाईक देते दमदार मायलेज

TVS Sport: आशिया बूक ऑफ रिकॉर्ड आणि इंडिया बूक ऑफ रिकॉर्डनुसार टीव्हीएस स्पोर्टने मायलेजचं नवीन रिकॉर्ड बनावलाय. या मायलेजमुळे ही बाईक बाईकप्रेमींच्या पसंती उतरलीय.
TVS Sport:
TVS Sport:

Tvs Sport Bike Mileage :

कोणताही ग्राहक दुचाकी घ्यायला जातो तेव्हा तो सर्वात आधी बाईक किती मायलेज देते हा प्रश्न करत असतेो.सामान्य ग्राहकांच्या हा प्रश्न लक्षात टीव्हीएस कंपनीने एक शानदार बाईक तयार केलीय.या बाईकचं मायलेज पाहून अनेकजण या दुचाकीच्या प्रेमात पडलेत.सध्या ईलेक्ट्रिक वाहनांचा जमाना आला परंतु तरीही टू-व्हीलर बनणाऱ्या कंपन्या या इंधनावर चालणाऱ्या उत्कृष्ट बाईक बाजारात आणणत ई- वाहनांना तोडीस तोड टक्कर देत आहेत. (Latest News)

टीव्हीएस स्पोर्ट कंपनीने एक बाईक बाजारात आणलीय. ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 110 किलोमीटरचा पल्ला गाठते असा दावा कंपनीकडून केला जात आहे.कंपनीच्या या दाव्याची आपण आज शाहनिशा करणार आहोत. आशिया बूक ऑफ रिकॉर्ड आणि इंडिया बूक ऑफ रिकॉर्डनुसार टीव्हीएस स्पोर्टची बाईकने 110.12 किलोमीटरचा पल्ला गाठत नवी इतिहास बनवलाय.

Tvs Sport  Bike
Tvs Sport Bike

दरम्यान बाइकमध्ये 110cc इंजिन मिळते जे 8.29PS पॉवर आणि 8.7Nm टॉर्क जनरेट करते. यात 4 स्पीड गिअरबॉक्स आहे. त्यात बसवलेले ET-Fi तंत्रज्ञान इंधनाचा वापर कमी करते. बाईकमध्ये 10 लिटरची इंधन टाकी आहे. दुचाकी घेणारे ग्राहक बहुसंख्येत ग्रामीण भागात राहतात. ग्रामीण भागात रस्ते चांगल्या पद्धतीचे नसतात. त्यावेळी बाईकमध्ये चांगल्या प्रकारे सस्पेशन असणं गरजेचं असतं, अशी मागणी ग्राहकांकडून केली जाते.

टीव्हीएस कंपनीने ग्राहकांची तीही अपेक्षा लक्षात या बाईकमध्ये पुढील आणि मागील बाजूला मजबूत आणि चांगले सस्पेंशन दिलेत. ब्रेकिंगसाठी कंपनीने पुढच्या चाकामध्ये 130 मिमी ड्रम ब्रेक तर मागील चाकामध्ये 110 मिमी ड्रमची सुविधा देण्यात आलीय. ही बाईक ईलेक्ट्रिक जरी नसली तर या इलेक्ट्रिक स्टार्टची सुविधा देण्यात आलीय.

बाईकची सीट मऊ असून चालक आरामत बसून शंभर किलोमीटर पल्ल्याचा प्रवास आरामत करू शकतो. राजस्थानमध्ये TVS Sport ES ची एक्स-शोरूम किंमत 59,431 रुपये आहे. महाराष्ट्रात या बाईकची किंमत काय असेल याची माहिती अद्याप मिळालेली नाहीये परंतु अपेक्षा आहे राज्यात ही बाईक याच किमतीत मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

TVS Sport:
Mahindra Thar 5 Door या दिवशी होणार लॉन्च, कंपनीने तारीख केली जाहीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com