Bhandara Crime Saam
महाराष्ट्र

Crime News: डोक्यावर काचेचा ग्लास फोडला, कपडेही फाडले; दारूच्या अड्ड्यावर राडा, क्षुल्लक कारणावरून तरूणाला चोपला

Bhandara Police Crack Down on Accused in Youth Assault Case: भंडाऱ्याच्या लाखनी शहरातील एका बिअर बारमध्ये किरकोळ वादातून सहा ते सात तरुणांच्या टोळक्याने मिळून एकट्या तरुणावर अमानुष हल्ला चढवला.

Bhagyashree Kamble

शुभम देशमुख, साम टीव्ही

भंडाऱ्याच्या लाखनी शहरात किरकोळ वादातून राडा झाल्याची घटना घडली आहे. केवळ "हळू आवाजात बोला" एवढंच सांगितल्यामुळे सहा ते सात तरूणांच्या टोळक्याने मिळून एका तरूणाला बेदम मारहाण केली. हल्ल्यानंतर आरोपी तिथून फरार झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे.

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव धनराज वाघाये असे आहे. मारहाण झालेल्या दिवशी तो एकटाच टेबलवर बसून मद्यप्राशन करत होता. त्याचवेळी दुसऱ्या टेबलावर सहा ते सात तरुण दारू पित होते. ते मोठ्या आवाजात बोलत असल्याने, धनराजने त्यांना "हळू आवाजात बोला" असे विनम्रपणे सांगितले.

मात्र, धनराजचा टोळक्याला राग आला. तरूण आणि गावगुंडांमध्ये वाद उफाळून आला. वाद इतका विकोपाला गेला की, तरूणांनी एकत्रितपणे धनराजवर हल्ला चढवला. त्यांनी त्याच्या डोक्यावर काचेचा ग्लास फोडला, कपडे फाडले आणि बेदम मारहाण केली. हल्ल्यानंतर आरोपी तेथून फरार झाले.

आरोपी फरार झाल्यानंतर जखमी अवस्थेत तरूणाला रूग्णालयात नेण्यात आले. पोलिसांना याची माहिती त्यांनी जखमी तरूणाचा जबाब नोंदवला. तसेच तपासाला सुरूवात केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. तसेच इतरांवर गुन्हा दाखल केला. सध्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : माजीं खासदरनवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून गणरायाचे विसर्जन

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

SCROLL FOR NEXT