भंडाऱ्यातील पवनी महोत्सवात नाचत असताना स्टेज कोसळला.
शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह काही पदाधिकारी जखमी झाले.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जखमींना तातडीने प्रथमोपचार करण्यात आले.
भंडारा येथे पवनी महोत्सवामध्ये नाचत असताना अचानक स्टेज कोसळला. या घटनेत शिवसेना शिंदे गटाच्या आमदारासह अनेक जण स्टेजवरून खाली कोसळले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेत आमदारासह पाच ते सहा जणांना किरकोळ दुखापत झाली. या घटनेमुळे कार्यक्रमात काही काळ गोंधळाचे वातावरण होते. जखमींना तातडीने प्रथमोपचार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा विधानसभेतील शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या मित्र मंडळकडून पवनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी पवनी इथे गायिका शहनाज अख्तर यांचा कार्यक्रम होता. गायनाच्या कार्यक्रमानंतर अखेरीस शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासोबत स्टेजवर कार्यक्रमाचा आनंद घेत होते. सर्वजण नाचत होते त्याचवेळी अचानक स्टेज कोसळला.
स्टेज कोसळल्यामुळे त्यावर उपस्थित असलेल्या शिवसेना आमदार भोंडेकर यांच्यासह पाच ते सहा जण खाली पडले. या सर्वांनी एकमेकांना पकडून सावरण्याचा प्रयत्न केला. या घटनेमध्ये आमदार भोंडकर यांच्यासेह काही जण जखमी झाले. तातडीनं अन्य कार्यकर्त्यांनी एकमेकांना मदत करत सर्वांना उचललं. आमदार भोंडेकर आणि त्यांचे कार्यकर्ते खाली कोसळतानाचा व्हिडीओ समोर आला असून तो समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर काही कार्यक्रमात गोंधळाचे वातावरण होते. सर्वांवर तातडीने उपचार करण्यात आले. या घटनेनंतर कार्यक्रम थांबवण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.