Bhandara Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : स्कूल बसचा भीषण अपघात, झाडाला धडक दिल्यानंतर...; २२ विद्यार्थी जखमी

Bhandara Accident News : भंडाऱ्यात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या शाळेच्या बसचा भीषण अपघात. दुर्घटनेत २२ विद्यार्थी जखमी झाले आहेत. बसचालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Alisha Khedekar

भंडाऱ्यात २२ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कुल बसचा भीषण अपघात

बस अनियंत्रित झाल्याने अपघात

निलज फाटा परिसरात ही घटना घडली

सर्व विद्यार्थी जखमी

विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु

भंडारा मधून मोठी बातमी समोर आली आहे. २२ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कुल बसचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत २२ विद्यार्थी जखमी झाले आहेत. बसचालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असून जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडाऱ्यात विद्यार्थ्यांना घेऊन पवनीवरून भिवापूर येथे खाजगी स्कुल बस जात होती. या बस मध्ये एकूण २२ विद्यार्थी १ केअर टेकर आणि ड्राइव्हर होता. ही स्कुल बस निलज फाटा येथे येताच बसचालकाचा बसवरील ताबा सुटला आणि गाडी अनियंत्रित झाली. पुढे जाऊन ही बस झाडाला धडकली.

या दुर्घटनेत बसमधील २२ विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय भिवापूर येथे हलविण्यात आले. तेथे सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार सर्व विद्यार्थी सुरक्षित असून, केवळ किरकोळ दुखापत झाल्याचे स्पष्ट केले.

चालकाच्या सतर्कतेमुळे २२ मुलांचे प्राण वाचले आहेत. दरम्यान नेमका हा अपघात कसा झाला ? या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT