Bhandara News Heavy rain Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News: भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यात वीज कोसळून २० मजूर जखमी; जिल्ह्यात 'यलो अलर्ट' जारी

Gangappa Pujari

शुभम देशमुख; प्रतिनिधी...

Maharashtra Rain Updates News: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे राज्यात अनेका ठिकाणी दुर्देवी घटना समोर येत आहेत. भंडारा जिल्ह्यातही दोन विज पडल्याच्या घटना समोर आल्या असून यामध्ये २० जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, भंडारा (Bhandara) जिल्ह्यात कालपासून काही ठिकाणी मध्यम तर रिमझिम पाऊस बरसात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. पाऊस सुरु झाल्याने सध्या शेतीचे हंगाम सुरू आहे. अशातच विज पडल्याच्या दोन दुर्देवी घटना समोर आल्या आहेत.

काल सायंकाळच्या सुमारास शेतावर काम करत असताना जिल्ह्यात साकोली व पवनी तालुक्यात वीज कोसळण्याच्या घटना घडल्या. यामध्ये साकोली येथे दोन मजूर जखमी झाले असून त्यांचे उपचार साकोली येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू आहेत.

तर दुसरी घटना पवनी तालुक्यातील चिचाळ येथे घडली असून शेतात रोवणी करत असताना अचानक वीज पडली. यामध्ये 20 महिला- पुरुष मजदुर जखमी झाले असून मोठा अनर्थ टळला . या अपघातातील जखमींना अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, पावसाचा जोर वाढल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Vidhan Sabha : सांगलीत काँग्रेससमोर उमेदवारीचा पेच; जयश्री पाटील उमेदवारीवर ठाम!

Fast Benefits: उत्तम आरोग्यासठी उपवास आहे 'वरदान'

Diwali: दिवाळीचा घराचा प्रत्येक कोपरा सजवा अशा पद्धतीने;होईल आर्थिक भरभराट

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर, सलमान खान धमकीनंतर गृह विभागाला निर्देश

Armaan Malik Accident: 'मरता मरता वाचलो...' बिग बॉस फेम अभिनेत्याच्या कारचा झाला अपघात; Video केला शेअर

SCROLL FOR NEXT