Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील वाहनांचा सुसाट वेग कमी होईना; कारवाई करणाऱ्या प्रशासनाचा हतबलपणा आला समोर

Samruddhi Mahamarg News: छत्रपती संभाजीनगरच्या आरटीओची स्पीडगन ही हतबल झाली आहे.
Samruddhi Mahamarg
Samruddhi MahamargSaam tv
Published On

chhatrapati sambhaji nagar News: समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असताना वाहनधारक आपल्या वाहनांचा वेग काही कमी करायला तयार नसल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या आरटीओची स्पीडगन ही हतबल झाली आहे. कारण वाहनांचा वेग हा १६० ते १८० इतका असल्यानं फोटोही घेता येईनात, ही बाब समोर आली आहे. (Latest Marathi News)

समृद्धी महामार्गावरील अपघातांना आळा घालण्यासाठी आरटीओचे एक पथक रात्रंदिवस या महामार्गावर कर्तव्य बाजावत आहे. या मार्गावर धावणारी वाहने इतक्या वेगाने पळवली जातात, की आरटीओची स्पीडगन त्यांच्यापुढे हतबल होत आहे. ही गन वेग मोजते, पण फोटो घेण्यास असमर्थ ठरत असल्याने अशा वाहनांवर कारवाई करणे अवघड होत असल्याचं अधिकारी कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले आहे.

Samruddhi Mahamarg
Uddhav Thackeray Thane Meeting: CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; ठाण्यात उत्तर भारतीयांसह शक्तिप्रदर्शन करणार

समृद्धी महामार्ग डिसेंबर २०२२ मध्ये वाहतुकीस खुला झाल्यापासून अनेक अपघात झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ११२ किमी हद्दीत नऊ अपघातात १६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर १२ प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यामुळेच काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

अपघात कमी करण्यासाठी दादा भुसेंची नागपुरात बैठक

दरम्यान, समृद्धी महामार्गावरील अपघात कमी व्हावे, या उद्देशानं उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात बैठक सुरु आहे . या बैठकीत पोलीस, आरटीओ, MSRDC विभागाचे अधिकारी सहभागी झाले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर बस अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर समृद्धी महामार्गावर अपघात कमी करण्यासाठी उपाययोजन आखण्यासाठी विचारमंथन सुरु आहे.

Samruddhi Mahamarg
Modi Surname Case: मोदी आडनाव प्रकरण! सुप्रीम कोर्टाची गुजरात सरकार अन् पूर्णेश मोदींना नोटीस; १० दिवसात उत्तर द्यावे लागणार

समृद्धी महामार्गावरील आतापर्यंत अपघातात ९५ लोकांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच आहे .समृद्धी महामार्गावर गेल्या पाच महिन्यात ३५८ अपघात झाले आहेत. या अपघातात ९५ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य सरकारने विधान परिषदेत दिली.

सरकारने समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे सांगितली आहेत. वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवणे, वाहन चालवताना सुरक्षित अंतर न ठेवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, लेनची शिस्त न पाळणे, सुस्थितीत वाहन नसने, वाहन अवैध्यरित्या पार्क करणे, वाहतूक सुरक्षततेविषयी काळजी न घेणे, चालक सतर्क न करणे ही समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघाताची कारणे राज्य सरकारने विरोधकांच्या प्रश्नाला दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com