Bhandara Accident Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Accident : वाळूचा भरधाव डंपरने ८ वर्षीय चिमुकलीला चिरडले; ग्रामस्थ आक्रमक, वरठी रेल्वे पुलावर चक्का जाम आंदोलन

Bhandara News : भंडाऱ्याच्या वरठीत रेल्वे पुलावरून जात असलेल्या दुचाकीला रेतीच्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात ८ वर्षाच्या लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख  
भंडारा
: अवैध वाळू वाहतूकिला छाप बसलेला नसून वाळूने भरलेल्या डंपर भरधाव वेगाने नेले जात असतात. यामुळे अनेक अपघात झाले आहेत. अशाच प्रकारे रेतीने भरलेल्या डंपरने जोरदार धडक दिल्याने ८ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला होता. तर दोन जण जखमी झाले आहेत. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज भंडाऱ्याच्या वरठी रेल्वे पुलावर चक्का जाम आंदोलन करत अनेक मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत.  

भंडाऱ्याच्या वरठीत रेल्वे पुलावरून जात असलेल्या दुचाकीला रेतीच्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात ८ वर्षाच्या लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. सदरचा अपघात दोन दिवसांपूर्वी घडला असून या प्रकरणात गांभीर्याने घेत वरठी व एकलरी ग्रामपंचायतच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिला होता. या घटनेच्या निषेधार्थ आज आंदोलन करण्यात आले. अपघात झालेल्या ठिकाणी म्हणजे रेल्वे पुलावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. 

आंदोलनात करण्यात आलेल्या मागण्या 

दरम्यान या आंदोलनात प्रशासनाने मृत्यू पावलेल्या मुलीच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी. पुलावरून होणारी भरधाव जड वाहतूक बंद करावी. पुलावरील खड्डे दुरुस्त करून पुलाच्या दोन्ही बाजूला रेलिंग बसवावी व वरठीकरांसाठी रेल्वे क्रॉसिंग वरून ओवर ब्रिज तयार करावे; अशा विविध मागण्यांना घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने वरठीच्या रेल्वे पुलावर चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली.  

पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे 

दरम्यान या आंदोलकांनी महामार्ग अडवत प्रशासना विरोधात घोषणाबाजी केली आहे. तर प्रशासनाने तात्काळ मागण्यांकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत समस्या सोडवाव्या व मृत मुलीच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. दरम्यान पोलीस विभागाने नागरिकांची समजूत काढत आंदोलन मागे घेण्यात आलं. मात्र या चक्का जाम आंदोलनामुळे पुलावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: IIT पवईच्या बाहेर वंचितचा आंदोलन

राज्यातील जिल्ह्यांची संख्या वाढणार? सरकारकडून हालचालींना वेग; 7 तालुक्यांसाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा, बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

T20 Ranking: टी २० रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा जलवा! टॉप ५ मध्ये २ तडाखेबंद फलंदाज

Skin Care: ग्लोइंग आणि मॉइश्चराइज स्किनसाठी घरच्या घरी बनवा 'ही' नाईट क्रीम; ५ दिवसांत दिसेल फरक

SCROLL FOR NEXT