Manoj Oswal News : राज्यातील वाढत्या भटक्या कुत्र्यांना माजी मंत्री जबाबदार; मनोज ओसवालांनी साधला मनेका गांधींवर निशाणा

Pune News : भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर असून गेल्या ४ वर्षात कुत्र्यांच्या चाव्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. श्वान नियंत्रण कार्यक्रमात सतत व्यत्यय येत असल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून कुत्रे चावण्यात सरासरी १० टक्के वाढ
Manoj Oswal Maneka Gandhi
Manoj Oswal Maneka GandhiSaam tv
Published On

सागर आव्हाड 
पुणे
: काही वर्षापासून राज्यात भटक्‍या कुत्र्यांची संख्‍या वाढत आहे. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणणे कठीण होत चालले आहे. वाढते शहरीकरण, अन्नाची नासाडी, कचरा आदी कारणे त्‍यास कारणीभूत असली तरी कुत्र्यांची नसबंदी देखील करण्यात आलेल्या आहे. मात्र या वाढत असलेले कुत्रे आणि कुत्र्यांकडून घेण्यात येणाऱ्या चावा या सर्व गोष्टीला माजी मंत्री मनेका गांधी जबाबदार असल्याचा आरोप मनोज ओसवाल यांनी केला.

महाराष्ट्रात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर असून गेल्या ४ वर्षात कुत्र्यांच्या चाव्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. श्वान नियंत्रण कार्यक्रमात सतत व्यत्यय येत असल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून दरवर्षी कुत्रे चावण्याच्या संख्येत सरासरी १० टक्के वाढ होत आहे. याला मेनका गांधी जबाबदार आहे. मनेका गांधी ज्या भारतातील प्राण्यांच्या स्वयंघोषित संरक्षक आहेत. त्यांच्या इच्छा आणि आवडीनुसार जसे वाटेल तसे करतात. मनेका गांधी या काही सदस्यांसह एक संस्था चालवितात; जे प्राणी वाचवण्याचे नाटक करतात. पण प्रत्यक्षात पैसे कमावण्यासाठी खंडणीचे रॅकेट चालवतात. त्यांच्या स्वयंसेवकांकडे कोट्यवधी रुपये असून त्यांना कोणताही व्यवसाय किंवा नोकरी नाही. या खंडणीच्या पैशातून स्वतः मनेका गांधी यांची संपत्ती दरवर्षी अनेक कोटींनी वाढली असल्याचा आरोप देखील ओसवाल यांनी केला आहे. 

Manoj Oswal Maneka Gandhi
Lasalgaon Crime : दत्त मंदिरात चोरी; चांदीचा मुकुट व राजदंड नेला चोरून

भटक्या कुत्र्यांची संख्या ६२ लाखांवर  
भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक हैराण असून एकट्याने फिरणे कठीण बनले आहे. विशेषत: लहान मुलांचा जीव धोक्‍यात आला आहे. सध्‍या राज्‍यात भटक्या कुत्र्यांची संख्या ६२ लाख इतकी आहे. त्‍यात वाढ होत चालली आहे. कुत्रा कुठून येईल आणि चावा घेईल याची शाश्‍वती नाही. या भटक्या कुत्र्यांनी आत्तापर्यंत चार लाख २३ हजार लोकांना एक वर्षात चावा घेतला आहे. या भटक्‍या कुत्र्यांमुळे रस्‍ते अपघातांत देखील वाढ झाली आहे. 

कुत्र्यांच्या वाढीची कारणे
अनेकांच्या घरातील शिळे अन्न, उरलेले अन्न हे रस्त्याच्या बाजूला, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, मोकळ्या जागेत टाकले जाते. हे अन्न भटकी कुत्री खात असतात. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे उघड्यावर अन्न टाकण्यास प्रामुख्याने बंदी घातली पाहिजे. तर राज्य सरकारतर्फे भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात फंड खर्च केला जातो. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणावयाचे असेल तर पंचायती आणि पालिकांकडून योग्य नियोजनाची गरज आहे. जेवढे कचऱ्याचे ढिगारे अधिक होतील. तेवढीच भटक्या कुत्र्यांची संख्या वाढेल. भटक्‍या कुत्र्यांची पैदास रोखण्‍यासाठी त्‍यांचे लसीकरण होणेही गरजेचे आहे.

Manoj Oswal Maneka Gandhi
Sambhajinagar Crime : मेंढपाळ कुटुंबावर सशस्त्र दरोडा; मारहाण करत दागिन्यांसह रोख रक्कम लुटली, ८ जण जखमी

श्वान नियंत्रण कार्यक्रमामध्ये मेनका गांधी यांच्या हस्तक्षेप
मेनका गांधी यांच्या पत्राच्या आधारे जे पत्र शहरी विकास मंत्रालयाने लिहले आहे. त्यामुळे भारत सरकारचे महत्वपूर्ण योजना NAPRE - National Program for Rabies Elimination पूर्ण थांबवली गेली आहे. हि योजना भारतामध्ये २०३० पर्यंत रेबीस रोग पूर्णपणे संपिवण्यासाठी आहे. मात्र ई- मेल पूर्णपणे खोटा आणि निराधार आहे. कुठलीही चौकशी न करता व पुरावे न बघता ई- मेल खरा समजून कार्यवाही करण्यात अली आहे. तसेच कुत्र्यांना लस देण्यासाठी खर्च करण्याची आवश्यकता नाही. लस सरकार फ्री मध्ये देत आहे. जे पूर्णपणे खोटे आहे. गांधी यांच्या संस्थेला काम मिळाले नाही म्हणून केंद्रीय योजना थांबवण्यात आल्याचे ओसवाल म्हणाले. 

मोठ्या शहरांच्या बजेटवर लक्ष 
मनेका गांधी यांना भारतातील श्वान नियंत्रण कार्यक्रमावर शंभर टक्के नियंत्रण हवे आहे. ज्यात भरपूर पैसा आहे. त्यांचे लक्ष फक्त मोठे बजेट असलेल्या मोठ्या शहरांवर आहे. मुंबई, पुणे, कल्याण- डोंबिवली, मीरा- भायंदर, वसई- विरार आदी ठिकाणी निविदांचे वाटपावर त्या जबरदस्तीने नियंत्रण घेत आहेत. हाच प्रकार पूर्ण भारत भर सुरु आहे. बंगलोर, हैदराबाद, अहमदाबाद येथे त्यांनी हस्तक्षेप करून भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणाचे काम थांबवायचे खूप प्रयत्न केले आणि तिथे देखील सतत काम बंद चालू होत आहे.

२०१९ मध्ये मनेका गांधी यांचे मंत्री पद गेले. त्या नंतर त्यांचे पूर्ण वेळ प्राण्यांच्या नावावर खंडणी करणाऱ्या 'प्राणी मित्र संघटना' ला प्रोत्साहन देऊन त्यांच्या मार्फत दहशत पसरविण्यात जात आहे. २०२० पासून मनेका गांधी यांच्या हस्तक्षेपामुळे कुत्र्यांच्या नियंत्रणाच्या शस्त्रक्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जेथे मनेका गांधी यांच्या पसंतीच्या संस्थेला किंवा त्यांच्या संस्थेला काम मिळत नाही; त्या पालिकेतील काम थांबवण्यात येते. त्यामुळे कुत्रा चावणे आणि रेबीजच्या केसचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com