Bhandara Accident Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Accident : कामावर जाणाऱ्या मजुरांच्या वाहनाला भीषण अपघात; २ मजुरांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

Bhandara News : गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातून काही मजूर बाहेर कामासाठी जात असतात. दरम्यान कामावर मजूर नेत असताना समोरून येणाऱ्या ट्रक चालकाने भरधाव ट्रक चालवित समोरून येणाऱ्या चारचाकीला जोरदार धडक

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: बांधकाम करणाऱ्या मजुरांना घेऊन गाडी मार्गस्थ झाली असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सदरचा अपघात लाखनी- पालांदूर मार्गावर पालांदूर जवळील गुरढा येथे घडला आहे. जखमींना लागलीच जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातून काही मजूर बाहेर कामासाठी जात असतात. रोजप्रमाणे आज देखील सकाळी मजूर गाडीने जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान कामावर मजूर नेत असताना समोरून येणाऱ्या ट्रक चालकाने भरधाव ट्रक चालवित समोरून येणाऱ्या चारचाकीला जोरदार धडक दिली. यात गाडीत असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना लाखनी तालुक्यातील गुरढा येथे घडली. 

कामावर जाताना अपघात 

कांद्री तालुका तुमसर येथे नाली बांधकामाकरिता चारचाकी वाहानाने हे मजूर पालांदूर जात होते. लाखनीमार्गे गुरढावरून पालांदूरकडे येत असलेल्या ट्रकने समोरील वाहनाला धडक दिली. यात वाहन प्रदीप प्रमोद बाईन (वय ४३, रा. चामोर्शी जि. गडचिरोली) तसेच प्रमोद ऋषी पुस्तोडे (वय ४२, रा. एगाव ता. अर्जुनी/मोर. जि. गोंदिया) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. 

ट्रक चालकावर गुन्हा दाखल 

तसेच अपघातात एगाव (ता. अर्जुनी/मोर जि. गोंदिया) येथील कालिदास बी. पंधरे (वय ३६), दिनेश बनकर (वय २८) निशांत मेश्राम (वय २१) हे गंभीर जखमी झाले आहे. तिन्ही जखमींना जिल्हा रुग्णालय भंडारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ट्रक चालक दिलीप बिसेन याचेवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पालांदूर पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamir Khan Marriage : आमिरच्या लग्नाची तारीख ठरली, तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात?

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

अचानक धनलाभ होईल, नोकरीत प्रमोशन मिळेल; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन होणार सुरू

कोकणात ठाकरेसेनेचा उमेदवार फोडला; महाराष्ट्राच्या राजकारणात माघारीचा पॅटर्न, कोणी कुठे घेतली माघार?

लाडकींना सरकारी लाभ सोडवेना; अपात्र लाडकींनी वळवला 'या' योजनांकडे मोर्चा

SCROLL FOR NEXT