Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : लोंबकळलेल्या विद्युत तारेला स्पर्श होऊन जोरदार झटका; शेतात कामासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

Buldhana News : गाडीतून वखर खाली उतरत असताना फरान यांनी वखर खांद्यावर घेतला तेव्हा वखराच्या दांडीचा स्पर्श खाली लोंबकळलेल्या ११ केव्हीच्या तारेचा स्पर्श झाला.

संजय जाधव

बुलढाणा : लोणार तालुक्यातील मांडवा येथील शेतकरी पुत्र फरान खाॅ सुभान खाॅ पठाण यांचा लोंबकळलेल्या ११ केव्ही तारेचा करंट लागल्याने मृत्यू झाल्याची घटना मांडवा शिवारात घडली. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे बाली गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. 

सदरची घटना प्रकाश आसाराम वाघ यांच्या शेतामध्ये घडली आहे. पेरणीचे दिवस जवळ आल्याने (Buldhana) शेतीच्या मशागतीला सुरुवात झाली आहे. फरान खाॅ पठाण यांनी आपल्या शेताच्या शेजारी असलेल्या प्रकाश आसाराम वाघ यांच्या बैलगाडी घेऊन शेतात वखरणी करण्यासाठी गेला होता. बैलगाडी प्रकाश वाघ यांच्या गोठ्याजवळ उभी केली आणि गाडीतून वखर खाली उतरत असताना फरान यांनी वखर खांद्यावर घेतला तेव्हा वखराच्या दांडीचा स्पर्श खाली लोंबकळलेल्या ११ केव्हीच्या तारेचा स्पर्श (Electric Shock) झाला.

एकुलता एक मुलगा गेला 
फरान खाली कोसळल्यावर प्रकाश वाघ यांनी त्याचा चुलत भाऊ सिंकदर खाॅ सरदार खाॅ पठाण यास फोन करून शेतात (Farmer) बोलविले. यानंतर फरानला मोटरसायकलवर बसून बीबी ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी फरानला मृत घोषित केले. फरान हा एलएलबीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. आई- वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई- वडील व तीन बहिणी आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT