Sangli Bribe Trap
Sangli Bribe TrapSaam tv

Sangli Bribe Trap : शाळेचे अनुदान मंजूर केल्याप्रकरणी घेतले एक लाख; महिला अधिकाऱ्यासह दोघे ताब्यात

Sangli News : सपना घोळवे या सातारा जिल्हा समाज कल्याण अधिकारी म्हणून कार्यरत असून सांगलीतील इतर मागास बहुजन कल्याण विभागातील सहाय्यक संचालकाचा अतिरिक्त कार्यभार देखील त्यांच्याकडे होता
Published on

सांगली : निवासी शाळेला अनुदान मंजूर करून दिल्याबद्दल महिला अधिकारीकडून पैशांची मागणी करण्यात आली होती. यानुसार एक लाख रुपयांची लाच घेताना सांगलीत समाज कल्याण विभागातील महिला अधिकाऱ्यासह दोघाना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. 

Sangli Bribe Trap
Parbhani Bribe case : सही शिक्क्यासाठी लाच; ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या ताब्यात

समाज कल्याण अधिकारी सपना सुखदेव घोळवे व दीपक पाटील अशी दोघा अधिकाऱ्यांची नावे आहेत. सपना घोळवे या सातारा जिल्हा समाज कल्याण अधिकारी म्हणून कार्यरत असून सांगलीतील इतर मागास बहुजन कल्याण विभागातील सहाय्यक संचालकाचा अतिरिक्त कार्यभार देखील त्यांच्याकडे होता. सांगली (Sangli) जिल्ह्यातल्या एका निवासी शाळेला अनुदान मंजूर केल्याच्या मोबदल्यात सहा लाखांची मागणी सपना घोळवे यांनी केली होती. 

Sangli Bribe Trap
Nandurbar Crime : स्त्रियांचा वेष करत टाकला दरोडा; ५ किलो चांदी लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद

दोघांना रंगेहात पकडले 

मागणी केलेल्या रक्कमेतील एक लाख रुपयांची (Bribe) लाच स्वीकारताना सांगलीतल्या समाज कल्याणच्या कार्यालयामध्ये त्यांना लाचलुचपत विभागाकडून रंगेहात पकडण्यात आले आहे. तसेच याच प्रकरणात दहा हजारांची लाच घेतल्याप्रकरणी समाज कल्याण निरीक्षक दिपक भगवान पाटील यांना देखील ताब्यात घेण्यात आला आहे..समाज कल्याण विभागातील कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com