Bank Scam Saam tv
महाराष्ट्र

Bank Scam : दामदुप्पट रक्कमेसाठी बँकेत अफरातफर; बँक मॅनेजरसह नऊजण ताब्यात

Bhandara News : पैसे दुप्पट करून मिळण्याच्या आमिषाला बळी पडत भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील ॲक्सीस बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने बँकेतील विविध खात्यांमधुन ५ कोटी काढल्याची घटना घडली आणि एकच खळबळ माजली आहे

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: आपण दिलेल्या रक्कमेची दामदुप्पट करण्याच्या अनुषंगाने बँकेत अफरातफर करण्यात आली आहे. साधारण पाच कोटी रुपयांचे सहा कोटी रुपये मिळण्याच्या आमिषाला बँक मॅनेजरच बडी पडला असून यात तो फसला आहे. हा प्रकार भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे घडला असून या प्रकरणी ॲक्सिस बँकेच्या मॅनेजरसह नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

'लकी भास्कर' या वेब सिरीज सारख्या बँकेच्या पैशांची अफरातफर करून कोटी पैसे कमविणे बँक मॅनेजर महागात पडले आहे. पैसे दुप्पट करून मिळण्याच्या आमिषाला बळी पडत भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील ॲक्सीस बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने बँकेतील विविध खात्यांमधुन ५ कोटी काढल्याची घटना घडली आणि एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी शाखा व्यवस्थापकासह पैसे दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीतील ९ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

छत्तीसगडच्या टोळीने दिले आमिष 

छत्तीसगड आणि गोंदीया येथील या टोळीने तुमसर येथील ॲक्सीस बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला जाळ्यात ओढून ५ कोटींचे ६ कोटी देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडत शाखा व्यवस्थापकाने बँकेतूनच ५ कोटींची रोख काढून तुमसर येथील राजकमल ड्रायक्लिनर्स या दुकानात ठेवले होते. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी धाड घालत चौकशी केली असता हा प्रकार पुढे आला. 

आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता 

बँकेत अफरातफर झाल्याच्या प्रकरणात मोठे जाळे असण्याची शक्यता आहे. सदर प्रकरणी नऊ जणांची चौकशी सुरु असून सदर प्रकरणात काही दिल्लीच्या तर काही रायपूर आणि काही गोंदियाच्या लोकांचाही समावेश असून तपासादरम्यान पुढे आरोपींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : विराटसोबत ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच असं झालं, कुणाला विश्वासही बसणार नाही

Calcium Deficiency: शरीरात कॅल्शियम कमी असल्यास कोणती गंभीर लक्षणे दिसतात? जाणून घ्या

Thackeray Shivsena News : ठाकरेंच्या शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी, गुंडाच्या त्या कृत्यामुळे कल्याणमध्ये संताप, वाचा नेमकं काय घडलं?

Shrutz Haasan Photos: कपाळी टिकली अन् कातील नजर, साऊथच्या अभिनेत्रीने केले तरूणांना घायाळ

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार; बड्या नेत्याची भाजपच्या दिशेनं वाटचाल, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT