Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : आश्रम शाळेतील विद्यार्थीनीचा मृत्यू; शाळा व्यवस्थापनाने दिली दोन लाखांची मदत

Bhandara News : राजश्री हीची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बरी नव्हती. दरम्यान, तिला शाळा शिक्षकाने प्रथमतः सिहोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात होते

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: तुमसर तालुक्यातील चांदपुर टेमनी येथील एका खाजगी आदिवासी आश्रम शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थीनीचा भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थिनींची तब्बेत काही दिवसांपासून खराब होती. यामुळे  दाखल करण्यात आले होते. 

भंडारा (Bhandara News) जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील मोठागाव (आसलपाणी) येथील राजश्री मदन वाढीवे (वय १६) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. राजश्री हीची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बरी नव्हती. दरम्यान, तिला शाळा शिक्षकाने प्रथमतः सिहोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात होते. सिहोरा येथील डॉक्टरानी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले. यानंतर तिला तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर देखील राजश्रीच्या प्रकृतीत कुठलीच सुधारागा झाली नाही. यामुळे तिला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय रेफर करण्यात आले. 

मृत राजश्रीच्या आई वडिलांना १० लाखाची मदत 

जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजश्रीचा मृत्यू नेमका कोणत्या आजाराने झाला; हे अद्यापही समजू शकले नाही. राजश्रीच्या मृत्यूप्रकरणी (Ashram School) आश्रम शाळा व्यवस्थापनाने १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. संस्थेचे कार्यकारी सचिव यांनी वडील मदन वाढीचे यांना दोन लाख रुपयांचा धनादेश दिला. तसेच उरलेली आठ लाख रुपयांची रक्कम १५ दिवसांत देण्याचे लिखित आश्वासन दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : शरद पवार गटाला मोठा धक्का! बड्या नेत्याने धरली भाजपची वाट; पक्षप्रवेशाचा मुर्हूतही ठरला

HIV Symptoms: 'सतत ताप, वजन कमी होणे...'; पुरुषांमध्ये एड्सची सुरुवातीची 7 भयंकर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो धोका

Maharashtra Live News Update : धुळ्यात लग्नाच्या वराडाचा व्हॅनचा भीषण अपघात

७१ लाख महिलांचा लाभ रद्द; लाडकी बहीण योजनेवरून सुषमा अंधारे यांची जोरदार टीका

Mamata Banerjee : मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसमोर ड्रोनच्या घिरट्या; सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT