Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara : खराब रस्त्यावरील चिखलात अडकली रुग्णवाहिका; गर्भवती महिलेला चिखलातून काढावी लागली वाट

Bhandara News : तुमसर तालुक्यातील भेंद्रे खाई या गावातील पवन तिवाडे यांच्या पत्नीला प्रसुती कळा जाणवू लागल्या होत्या. यामुळे लागलीच रुग्णवाहिका बोलावण्यासाठी फोन करण्यात आला

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: प्रसूती कळा आल्याने गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्याकरिता रुग्णवाहिका गावात पोहोचली. मात्र, एन पावसाळ्यात गावात करण्यात आलेल्या अर्धवट कामामुळं रस्त्यावर निर्माण झालेल्या चिखलात रुग्णवाहिका फसली. यामुळे गरोदर महिलेला चिखलातूनच पायी वाट काढत जावे लागण्याचे चित्र भंडारा जिल्ह्यात पाहण्यास मिळाले. 

भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील भेद्रे खाई तामसवाडी या गावात घडली. आदिवासी वस्ती पाड्यांवर रस्त्यांअभावी रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र नेहमीच पाहण्यास मिळत असते. मात्र आज हे चित्र भंडारा जिल्ह्यात पाहण्यास मिळाले आहे. तुमसर तालुक्यातील भेंद्रे खाई या गावातील पवन तिवाडे यांच्या पत्नीला प्रसुती कळा जाणवू लागल्या होत्या. यामुळे लागलीच रुग्णवाहिका बोलावण्यासाठी फोन करण्यात आला. 

रस्त्यावरील चिखलात फसली रुग्णवाहिका 

काही वेळातच रुग्णवाहिका गावात दाखल झाली. यानंतर महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका मार्गस्थ झाली. मात्र पावसाळ्याच्या दिवसात गावातील रस्त्याचे अपूर्ण राहिलेल्या रस्त्याच्या कामामुळे सर्वत्र चिखल झालेला आहे. या चिखलात रुग्णवाहिकेचा चाक फसले होते. यामुळे चिखलात फसलेल्या रुग्णवाहिकेला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी धक्का मारून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र उपयोग झाला नाही. 

ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना 

रुग्णवाहिका चिखलात फसून असल्याने महिलेला चिखलातून पायदळ विव्हळत वाट काढावी लागली. चिखलातून रुग्णवाहिका न निघाल्याने शेवटी रुग्णवाहिका गावातील ट्रॅक्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर करण्यात आलेल्या अर्धवट कामामुळे गर्भवती महिलेला चिखलातून वाट काढावी लागल्यानं ग्रामस्थांमध्ये संताप बघायला मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk Price Increase: शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट! दूध खरेदी दरात तब्बल इतक्या रुपयांची वाढ|VIDEO

Kolhapur: ६ नृत्यांगणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; हाताच्या नस कापल्या अन्...; कोल्हापुरच्या महिला सुधारगृहात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: गुन्हेगारीच्या रील्स अपलोड केल्याप्रकरणी निलेश घायवळवर गुन्हा

Cultural Department Bonus: 'चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास'च्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; सरकारकडून इतका बोनस जाहीर

Dhanteras 2025: धनत्रयोदशीच्या दिवशी 'या' वस्तूंची खरेदी मानली जाते शुभ

SCROLL FOR NEXT