Bhandara News 14 months old boy died falling into water tank in Rajapur Saam TV
महाराष्ट्र

Bhandara News: खेळता-खेळता पाण्याच्या टाकीत डोकावला, तोल गेल्याने खाली पडला; १४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

Bhandara News Today: भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. एका १४ महिन्यांच्या चिमुकल्याचा अंगणातील पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला आहे.

Satish Daud

शुभम देशमुख, साम टीव्ही

Bhandara Latest News

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. एका १४ महिन्यांच्या चिमुकल्याचा अंगणातील पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास राजापूर गावात घडली. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अदिक अतुल शहारे (वय १४ महिने) असे मृत बाळाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अदिकचे वडील अतुल शहारे काही कामासाठी घराबाहेर गेले होते. आई घरकामात व्यस्त असल्याने त्यांनी अदिकला शेजाऱ्यांच्या घरी नेऊन सोडलं.

पण तेथून अदिक खेळत-खेळत घराकडे आला. दरम्यान, खेळता-खेळता अदिक अंगणातील पाण्याच्या टाकीजवळ गेला. टाकीचे झाकण उघडे असल्याने त्याचा पाय घसरून बुडून मृत्यू झाला.

काही वेळानंतर अदिकचे वडील घरी आले. त्यांनी शेजारच्यांना अदिक कुठे आहे, असं विचारलं असता तो घराकडे गेला आहे, असं शेजारच्यांनी सांगितलं. वडिलांनी शोधाशोध केली असता, अदिक कुठेही दिसून आला नाही.

दरम्यान, त्यांनी पाण्याच्या टाकीत डोकावून बघितलं असता. अदिक हा तरंगताना दिसून आला. त्याला तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्याआधीच अदिकचा मृत्यू झाला होता. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Blockage Symptoms: छातीत सतत जळजळ होतेय? अ‍ॅसिडीटी नाही, तर रक्तवाहिन्या ब्लॉकेजचा धोका, वाचा लक्षणे आणि उपाय

Maharashtra Live News Update: नांदेड जिल्ह्यात तुफान पाऊस

BB19: 'वीकेंड का वार' मध्ये एक नाही तर दोन स्पर्धक पडणार बाहेर; या सदस्यांना करावा लागणार एविक्शनचा सामना

Satara Doctor Death : फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात भाजपच्या माजी खासदारांचं नाव|VIDEO

Paneer Butter Masala Recipe: ढाबा स्टाईल पनीर बटर मसाला घरी कसा बनवायचा? रेसिपी आहे अत्यंत सोपी

SCROLL FOR NEXT