Bhandara News Saam Tv
महाराष्ट्र

Bhandara : ओव्हरटेक करू शकला नाही; एसटी भररस्त्यात अडवून कारचालकाचा धिंगाणा, VIDEO

Bhandara News : भंडाऱ्यात नागपूर नाका परिसरात चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नातून कारचालकाने एसटी बस अडवली. महामार्गावरील वाहतूक विस्कळीत; पोलिसांकडून अधिक तपास सुरू

Alisha Khedekar

  • चुकीच्या ओव्हरटेकमुळे महामार्गावर वाद

  • कारचालकाने एसटी बस अडवली

  • वाहतूक काही काळ ठप्प

  • एसटी चालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली

  • पोलिसांकडून अधिक तपास सुरू

शुभम देशमुख, भंडारा

Bhandara Nagpur Naka National Expressway Traffic राष्ट्रीय महामार्गावर चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात स्वतःची चूक असतानाही, एका कार चालकाने एसटी महामंडळाच्या बसला अडवून महामार्गावरच धिंगाणा घातला. सदर घटना भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरात घडली. नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बससमोर कार आडवी घालून झालेल्या या वादामुळे महामार्गावरील वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली होती, तर प्रवाशांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाची बस नागपूरच्या दिशेने मार्गस्थ होती. दरम्यान, भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरात एका कार चालकाने चुकीच्या साईडने बस ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यात कार चालकाची स्वतःची चूक असतानाही, त्याने एसटी बस थांबवून चालकासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.

कार चालकाच्या या उद्दामपणामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंच्या वाहनांच्या रांगा लागल्या.वाद बराच वेळ चालल्यानंतर एसटी चालकाने प्रसंगावधान राखत वादग्रस्त बस थेट भंडारा पोलीस ठाण्यात नेली आणि कार चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली.

या प्रकारामुळे बसमधील प्रवासी ताटकळले होते. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 मध्ये कोणत्या टीमच्या कर्णधाराला सर्वात कमी सॅलरी?

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सला तगडा झटका; आयपीएलच्या सलामीलाच वर्ल्डकप उपविजेत्या संघाचा 'कॅप्टन'च बाद

Maharashtra Live News Update: भिवंडीत गॅस लायटर बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग

Pune : पेट्रोल-डिझेलची खोटी माहिती पसरवली, पुण्यातील पंपावर कारवाई, विक्रीच बंद

Ashok Kharat: नवऱ्याबरोबर वाद झाला, सूख शांतीसाठी खरातकडे गेली; शुद्धीच्या नावाने ऑफिसमध्येच नको ते केलं, नवा कारनामा आला समोर

SCROLL FOR NEXT