House For MLAs Saam Tv
महाराष्ट्र

House For MLAs: मुख्यमंत्री साहेब आभार, सामान्य लोकांना घरं नाही, पण आमदारांना घरं; भंडाऱ्यात पोस्टर

हे पोस्टर इकडे कुठे नाही, तर चक्क काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या विधानसभा मतदार संघात जेवनाळा या गावात लागले आहेत.

अभिजित घोरमारे

भंडारा: "मुख्यमंत्री साहेब आभार सामान्य लोकांना घरे नाही. पण, गरीब आमदारांना 300 घरे बांधुन देणार याबद्दल आभार" या आशयाचे पोस्टर सद्धा भंडाऱ्यात लागले आहेत. या पोस्टरच्या माध्यमातून सामान्य लोक आपला आक्रोश व्यक्त करत आहे. हे पोस्टर इकडे कुठे नाही, तर चक्क काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या विधानसभा मतदार संघात जेवनाळा या गावात लागले आहेत (Bhandara Jevnala Posters Against CM Decision About Free House For MLAs).

नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या आर्थिक अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी (CM Uddhav Thackeray) आमदारांना मुंबईत 300 हक्काचे घर (House For MLAs) बांधून देण्याची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयावर सोशल मीडियावर अनेकांनी खोचक टीका ही केल्या. मात्र, जेवनाळा येथील युवा शेतकऱ्यांनी याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांचे कौतुक करत चक्क आभार माणणारे पोस्टर (Poster) आपल्या गावाच्या प्रवेश द्वारावर लावले आहे. आता चक्क मुख्यमंत्र्यांना थेट शुभेच्छा दिल्याने गाव चर्चेत येत आहे.

मागील आठवड्यात राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय आमदारांना मुंबईत हक्काचे 300 घरे बांधून देण्याची घोषणा केली. या घोषनेनंतर संतप्त शेतकऱ्यांसह नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रोष व्यक्त केला आहे. राज्य सरकारला शेतकऱ्यांपेक्षा आपल्या आमदारांची (MLA) जास्त चिंता असल्याचे दिसत असल्याच्या आरोप आता होऊ लागला आहे.

एकीकडे, सरकारला घरकुल वेळेत द्यायला वेळ नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक उघड्यावर संसार थाटत आहे. तर, दुसरीकडे राज्य सरकार श्रीमंत आमदारांना 300 घरे देत आहे. दरम्यान, शासनाकडून एखादी घोषणा झाली की सत्ताधाऱ्यांकडून मोठं-मोठे फलक लावत स्वतःची वाहवाही केली जाते. मात्र, आता आमदारांना घरे दिल्यावर याची पाहिजे तेवढी प्रसिद्धी केली जात नसल्याने जनसामान्यांना सरकारने घेतलेले निर्णय माहिती व्हावी. या उद्देशाने असे उपहासात्मक पोस्टर लावत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सद्धा जिल्ह्यात या पोस्टरची चर्चा सुरु झाली आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT