Bhandara Crime News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Crime: बलात्काराच्या आरोपातून दोषमुक्त होवून गावात आला अन् पुन्हा केले दुष्कृत्य; ग्रामस्थांनी चोप देत केली तुरुंगात रवानगी

ग्रामस्थांचा रोष बघता लाखांदूर पोलिसांनी तरूणाला बेड्या ठोकत त्याची कारागृहात रवानगी केली.

Gangappa Pujari

शुभम देशमुख, प्रतिनिधी...

Bhandara Crime: भंडारा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात अत्याचारातील गुन्ह्यातून २ दिवसांपूर्वी न्यायालयाने मुक्तता केलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी त्याला चोप देत पोलिसांच्या हवाली केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, भंडारा जिल्ह्यातील (Bhandara News) लाखांदूर तालुक्यातील आथली गावातील राजू शहारे (30) हा तरुण अंगणवाडी केंद्राच्या मदतनीसवर अत्याचार करून तिची विटांनी ठेचून निर्घृण हत्या केल्याच्या आरोपाखाली कारागृहात होता. मात्र त्याच्या विरुद्ध सबळ पुराने नसल्याने दोन दिवसांपूर्वी त्याची मुक्तता करण्यात आली.

मात्र गावात येताच त्याने एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या प्रसंगावधानानंतर ग्रामस्थांनी तरुणाला पकडून चांगला चोप देत त्याला पोलिसांच्या हवाली केले. यावेळी ग्रामस्थांचा रोष बघता लाखांदूर पोलिसांनी तरूणाला बेड्या ठोकत त्याची कारागृहात रवानगी केली. (Crime News)

दरम्यान, पाच वर्षांनी जेलमधून बाहेर आल्याने त्याच्यात सुधार झाला असेल अशी गावकऱ्यांची समजूत होती. मात्र गावात येताच त्याने मुलीच्या असाह्यतेचा फायदा घेत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याची पुन्हा एकदा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Maharashtra News Live Updates: ही तर गुजरात नवनिर्माण सेना; उद्धव ठाकरेंची टीका

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

Eknath Shinde : मला जेलमध्ये टाका, मी काय ऐरागैरा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर नेम

Assembly Election: पक्षाने अजित पवारांना तीनदा उपमुख्यमंत्री बनवलं, आता युगेंद्र; सांगता सभेत शरद पवारांचे आवाहन

SCROLL FOR NEXT