Bhandara Crime News Married women along with minor girls are also disappearing Shocking Information ssd92 Saam TV
महाराष्ट्र

Bhandara Crime News: सोळावं वरीस धोक्याचं...! अल्पवयीन मुलींसह विवाहित महिलाही होतायेत गायब, पुरुषांमध्ये भीती

Bhandara Crime News: भंडारा जिल्ह्यात जिकडे तिकडे मुली गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. अल्पवयीन मुलीचं नाही, तर विवाहित महीला देखील बेपत्ता झाल्या असल्याचं समोर आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

शुभम देशमुख, साम टीव्ही

Bhandara Crime News: भंडारा जिल्ह्यात जिकडे तिकडे मुली गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. अल्पवयीन मुलीचं नाही, तर विवाहित महीला देखील बेपत्ता झाल्या असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सोळावं वरीस धोक्याच असं म्हटलं जाते. भंडारा जिल्ह्यात 2016 पसून 14 मुली तर 18 वर्ष वयोगटावरील 131 मुली विवाहित महिला गायब झाल्याची नोंद पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.  (Breaking Marathi News)

गेल्या काही दिवसांपासून देशात महिला तसेच मुलींची तस्करी करणारे रॅकेट सक्रिय झालंय. दररोज शेकडो मुली बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत करण्यात येते. यात भंडारा (Bhandara News) जिल्हा सुध्दा मागे नाही जिल्ह्यात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढ होत आहे.

2016 पासुन अनेक मुली बेपत्ता झाल्या होत्या त्यातील काही मुलींचा पोलिसांनी (Police) शोध लावला पण अजून 14 मुली बेपत्ता आहेत. त्यांचा थांगपत्ता सुध्दा लागलेला नाही. तर फक्त अल्पवयीन मुलीचं नाही तर 2010 पासुन 18 वर्ष वयोगटातील 131 मुली, विवाहीत स्त्रिया बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण अद्यापही शोध लागला नाही. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात महिला तस्करीचा रॅकेट (Crime News) तर सक्रिय नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर आता या मुलींचा तसेच विवाहित महिलांचा शोध पोलीस नेमका कधी लावणार? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

"भंडारा जिल्ह्यात मुली बेपत्ता होत असल्याने पालकांमध्ये सुध्दा भीतीचे वातावरण पसरले आहे. मुली शाळेत जात असून मुली घरी येई पर्यंत पालकांमध्ये भिती असते, त्यामुळे मुली बेपत्ता झाल्या की आपल्या प्रियकरा सोबत पळून गेल्या हे कोडेच आहे. पोलिसांनी याचा शोध लावला नसल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर सुध्दा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. लवकरच आम्ही या महिलांचा शोध घेऊ, अशी प्रतिक्रिया भंडाऱ्याचे पोलीस उपअधिक्षक ईश्वर कतकडे यांनी दिली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT