Bhandara Crime Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Crime : बीडीसीसी बँक दरोड्याच्या प्रयत्नातील चारजण ताब्यात; वीस दिवसांनंतर पोलिसांना यश

Bhandara News : भंडारा जिल्हा बँकेतील कर्मचारी ४ डिसेंबरच्या सायंकाळी नियमित वेळेनुसार बँक कुलूपबंद करून घरी गेले तर बँक व एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षा कर्मचारी बँक परिसरात एटीएममध्ये कार्यरत होता

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: मागील पंधरवड्यापूर्वी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी भंडारा जिल्हा बँकेच्या समोरील दाराचे कुलूप तोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बँकेतील तिजोरी न तुटल्याने रक्कम सुरक्षित राहिली होती. या प्रकरणी पोलिसांकडून संशयितांचा तपास सुरु असताना वीस दिवसांनंतर संशयितांचा शोध घेण्यात यश मिळाले आहे. यात पोलिसांनी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेतले आहे. 

भंडारा जिल्हा बँकेत ४ डिसेंबरच्या रात्री चोरीचा प्रयत्न झाला होता. बँकेतील कर्मचारी ४ डिसेंबरच्या सायंकाळी नियमित वेळेनुसार बँक कुलूपबंद करून घरी गेले होते. तर बँक व एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षा कर्मचारी बँक परिसरात एटीएममध्ये कार्यरत होता. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बँकेचा वीजपुरवठा बंद करून समोरील कुलूप तोडून प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. 

तिजोरी न फुटल्याने सीसीटीव्हीच्या डीव्हीआर घेऊन फरार 

बँकेची रक्कम ठेवलेल्या तिजोरीतून रक्कम चोरण्याचा देखील प्रयत्न केला होता. मात्र तिजोरी न तुटल्याने त्यातील रक्कम सुरक्षित राहिली. मात्र चोरट्यानी खाली हात न जाता त्यांनी बँकेतील सीसीटीव्ही कॅमेराचे डीव्हीआर व मॉनिटर घेऊन पसार झाले होते. या प्रकरणी बँकेकड्न पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर पोलिसांकडून शोध मोहीम सुरु होती. 

वीस दिवसांनी लागला शोध  

तक्रार दाखल झाल्यानंतर चोरट्यांच्या शोधात पोलीस होते. या दरम्यान पोलिसांना अखेर १९ दिवसांनंतर यश आले असून चार जणांना अटक केली आहे. यात नागपूर येथील खाडीकपुरा पारडी येथील गोलू शेखर लारोकर (वय १९), मध्य प्रदेशातील पांढुरना जिल्ह्यातील बडचिचोली येथील पूर्वेश दिलीप खवसे (वय १९), सार्थक मनोहर नेवारे (वय २२) व नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील यशोधरा नगरीतील असलम अब्दुल शरीफ खान (वय २१) या चार आरोपींचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT