Bhandara Crime
Bhandara Crime  Saam Tv
महाराष्ट्र

Bhandara : चक्क मंदिरातून हनुमानाच्या मूर्तीचा डोळा चोरला; भंडाऱ्यातील घटना

अभिजीत घोरमारे

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या मोहाडीची शहरात हनुमान मंदिरात चोरीची घटना घडली आहे. मंदिरातून चक्क हनुमानाच्या मूर्तीचा चांदीचा डोळा चोरून (Robbery) नेल्याची घटना घडली आहे. मंदिरातून (Temple) चक्क सकाळी चोरी झाली आहे. चोरीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. ( Bhandara Crime News In Marathi )

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्याच्या मोहाडीची शहरात हनुमान मंदिरात सकाळी पुजारी आले होते. त्यांनी मंदिर उघडून हनुमानाच्या मूर्तीची पूजा करायला सुरूवात केली. मात्र, त्यावेळी त्यांना हनु्मानाच्या मूर्तीचा चांदीचा डोळा दिसला नाही. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्हीमध्ये जाऊन पाहिले. त्यानंतर त्यांना सकाळी पुष्पा नामक मानसिक रुग्ण महिलेने मंदिरात प्रवेश करत हनुमानाच्या मूर्तीचा चांदीचा डोळा चोरून नेला. त्यामुळे हनुमानाच्या मूर्तीचा चांदीचा डोळा चोरी गेल्याचे समजले.

भंडारा जिल्ह्यातील मोहाड़ी शहरातील बायपास रोड असलेल्या मंदिरात चोरीचा प्रकार घडला आहे. सकाळी हनुमानाचे मंदिर उघडे होते. त्यावेळी मंदिरात पुजारी देखील आले नव्हते. त्यावेळी पुष्पा नामक मनोरुग्ण महिलेने प्रवेश केला. त्यावेळी मंदिरात कोणीही उपस्थित नव्हते. त्याचाच गैरफायदा मनोरुग्ण महिलेने घेतला. हनुमानाच्या मूर्तीचा चांदीचा डोळा चोरून मंदिरातून फरार झाली. त्यानंतर पुजारी मंदिरात आल्यावर ही घटना उघडकीस आली आहे. या चोरीचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. सदर चोरीचा व्हिडीओ सोशल मीडियवार प्रचंड व्हायरल झाला आहे. सदर व्हिडीओ पाहिल्यानंतर हनुमान भक्तांकडून कारवाईची मागणी होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane News : दोन्ही ठाकरेंमधून कोण श्रेष्ठ? नारायण राणेंनी सांगितला मनातला 'राज'

RCB Vs GT : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- गुजरात टायटन्स भिडणार; आकडेवारी प्रत्येकाला थोडी चक्रावूनच टाकणारी!

Rakul Singh : असं रूपडं देखणं त्याला सूर्याचं रे दान

Home Remedies: उष्णता वाढल्याने जिभेला फोड आले आहेत? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेच २०२९ पर्यंत मुख्यमंत्री राहतील; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT