तलवार बाळगणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

तलवार बाळगणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : धुळे पोलिसांतर्फे गेल्या काही दिवसांपासून अवैध शस्त्रांच्या संदर्भात मोहीम छेडण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून तलवार बाळगणाऱ्याच्या स्‍थानिक गुन्‍हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुसक्या (Dhule News) आवळल्या. (dhule news lcb action Sword bearer in police custody)

अवैद्य शस्रासंदर्भात धुळे (Dhule) शहरातील देवपूर परिसरातील बापू भंडारी गल्ली या ठिकाणी एक इसम आपल्यासोबत धारदार शस्त्र बाळगून असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संबंधिताच्या घरी छापा टाकला असता त्या ठिकाणी धारदार तलवार पथकाला मिळून आली आहे. यासंदर्भात संबंधिताच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून तलवार देखील पोलिसांनी (Police) हस्तगत केली आहे. या संबंधिताच्या विरोधामध्ये देवपूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागासह देवपूर पोलिस करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com