Congress News x
महाराष्ट्र

Congress : काँग्रेसला मोठा धक्का! सहकारी बँकेच्या निवडणुकीत दिग्गज नेत्याच्या पॅनलचा दारुण पराभव, महायुतीचा विजय

Congress News : भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीमध्ये काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. महायुतीने १५ पैकी ११ जागा जिंकल्या आहेत, काँग्रेसला फक्त ४ जागा मिळाल्या आहेत.

Yash Shirke

  • भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे.

  • काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या पॅनलला करावा लागला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

  • १५ जागांपैकी ११ जागा महायुतीला, ४ जागा काँग्रेसला मिळवल्या आहेत.

पराग ढोबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Political News : भंडारा जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे नेते नाना पटोले यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भंडारा जिल्हा बँक निवडणूकांमध्ये नाना पटोले यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीला जिल्ह्यामध्ये मोठे यश मिळाले असून महाविकास आघाडीला पराभव पत्कारावा लागला आहे.

भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. भंडारा गोंदिया सहकार क्षेत्रात महायुतीला मोठे यश मिळाले हे. महायुतीने बँक निवडणुकीत पंधरा जागांपैकी अकरा जागा जिंकल्या आहेत. दुसऱ्या बाजूला काँग्रेसला फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले आहे.

भंडाऱ्यामध्ये नाना पटोले यांच्या पॅनलच्या पराभवानंतर भाजपचे नेते परिणय फुके यांनी नाना पटोले आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. 'सहकार क्षेत्रात महायुतीला मोठे यश मिळाले असून महाविकास आघाडीचे पानिपत झाले आहे. सहकार क्षेत्रामध्ये भाजप पहिल्यांदाच इतक्या ताकदीने उतरले आहे', असे वक्तव्य परिणय फुके यांनी केले आहे.

'महाराष्ट्रात आणि विदर्भात काँग्रेसच्या नेत्यांची जशी वागणूक आहे, त्या वागणूकीमुळे जनता काँग्रेसला त्रस्त झाली आहे. लोकांना दिशाभूल करण्याचे काम काँग्रेस करत आहे. यामुळे नाना पटोले आणि काँग्रेसचा जनाधार कमी होत आहे. भाजपची ताकद वाढली आहे, स्ट्राईक रेट वाढत आहे. महायुतीत असलेले नरेंद्र भोंडेकर हे दुग्ध संघाच्या निवडणुकीत नाना पटोले यांच्यासोबत गेले होते. मात्र चूक लक्षात आल्यानंतर बँक निवडणुकीत ते भाजपसोबत आहेत', असे परिणय फुके यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ऑगस्टचे ₹१५०० आले, सप्टेंबरचा हप्ता कधी येणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: बीडमध्ये पूर परिस्थिती कायम, सर्व शाळा-अंगणवाडीला आज सुट्टी

Success Story: दिवंगत वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी सोडली, दिली UPSC परीक्षा, पहिल्या प्रयत्नात IPS; स्वीटी सहरावत यांचा प्रवास

एक नंबर! इलेक्ट्रिक टू-व्हीलर मिळेल सब्सिडी; स्वस्तात येईल बाईक, 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय

Horoscope: प्रेमाची कळी खुलणार, जवळीक वाढेल; नाराजी होईल दूर

SCROLL FOR NEXT