कॅनरा बँकेत झालेल्या दरोड्याचा भंडाफोड पोलिसांनी केला.
बँकेचाच सहाय्यक प्रबंधक मयूर नेपाळे यांनी दरोडा टाकल्याचे उघड झाले.
ऑनलाईन गेमिंग आणि कर्जबादारीमुळे आरोपीने तब्बल १.५ कोटींची रक्कम लुटली.
शुभम देशमुख, भंडारा प्रतिनिधी
Bhandara Latest Marathi Crime News : भंडाऱ्यातील कॅनरा बँक दरोडा प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट समोर आलाय. बँकेच्या सहाय्यक प्रबंधकानेच बँकेत दरोडा टाकल्याचं उघड झालेय. ऑनलाईन गेमिंग नादात कर्जबादारी झालेल्या सहाय्यक प्रबंधकाने (असिस्टंट मॅनेजर) शिताफीने बँक लुटली. आपली चोरी कुणाला समजणार नाही, असे त्याला वाटले पण पोलिसांनी सखोल तपास करत भंडाफोड केला. असिस्टिंट मॅनेजरने मयूर नेपाळे यानेच बँक लुटल्याचे समजताच बँक कर्मचाऱ्यांसह सर्वांनाच धक्का बसला आहे. भंडाऱ्यातील चिखला माईन्स येथील कॅनरा बँकेत मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला होता. यामध्ये एक कोटी ५० लाख रूपयांची रोकड लंपास करण्यात आली होती.
ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनाने एका उच्च पदस्थ बँक अधिकाऱ्याला अक्षरशः गुन्हेगार बनवले आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या चिखला माईन्स येथील कॅनरा बँकेत एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली. बँकेच्या सहाय्यक प्रबंधकानेच तब्बल ८० लाख ५० हजार रुपयांच्या कर्जाच्या बोझ्याखाली येऊन चक्क आपलीच बँक लुटली. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी बँकेच्या सहाय्यक प्रबंधकाला नागपूर येथून अटक केली.
मयूर नेपाळे याने बँकेवर मध्यरात्री दरोडा टाकला अन् एक कोटी ५० लाख रुपयांची रक्कम चोरल्याची कबुली भंडारा पोलिसांना दिली. मयूर नेपाळे (32) असं पोलिसांनी अटक केलेल्या बँकेच्या सहाय्यक प्रबंधकाचं नाव आहे. त्याला नागपूर येथील त्याच्या घरून रोख रकमेसह अटक केली आहे. चोरी झालेल्या रकमेतील 96 लाख 12 हजार रुपयाची रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. आरोपीला ऑनलाईन गेमिंग, बेटिंचे व्यसन लागल्यामुळे त्याच्यावर ३० लाखांचे कर्ज झाले होते. त्याशिवाय शेअर मार्केट ट्रेडीं मध्ये 12 लाख कार लोन, एज्युकेशन लोन 3 लाख, पेटीएम लोन ३ लाख व इतर खासगी इसमांकडून 20 लाख असे एकूण 80 लाख 50 हजार रूपयांचे लोन त्याच्यावर होते. आपल्याकडचे कर्ज फेडण्यासाठी त्याने बँकेवरच दरोडा टाकला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.