Bhandara News: करवाढीविरोधात नगरवासियांचा एल्गार, मोहाडी नगरपंचायतीवर धडकला जनआक्रोश मोर्चा  Saamtv
महाराष्ट्र

Bhandara News: करवाढीविरोधात नगरवासियांचा एल्गार, मोहाडी नगरपंचायतीवर धडकला 'जनआक्रोश मोर्चा'

Mohadi Latest News: नगराध्यक्षा छाया डेकाटे यांनी वाढीव कर पुढील कारवाईपर्यंत स्थगित करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Gangappa Pujari

शुभम देशमुख, प्रतिनिधी

Bhandara Breaking News:

नगरपंचायत मोहाडीतर्फे नवीन करप्रणालीनुसार शहरातील नागरिकांवर भरमसाठ घर टॅक्स लादण्यात आल्याच्या निषेधार्थ नगरपंचायत कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा छाया डेकाटे यांनी वाढीव कर पुढील कारवाईपर्यंत स्थगित करण्यात येईल, असे आश्वासन दिले. नगराध्यक्षांच्या या आश्वासनानंतर मोर्चामधील सहभागी नागरिकांनी मोठा जल्लोष केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहाडी (Mohadi) शहरात राहणाऱ्या नागरिकांवर निवासी आणि अनिवासी असे दोन प्रकारचे कर लावण्यात आले आहेत. ज्यांनी आपल्या घरी भाडेकरू ठेवले आहेत किंवा व्यावसायिक दुकानासाठी आपली खोली भाड्याने दिली आहे, त्यांच्यावर अनिवासी करप्रणाली अंतर्गत तिप्पट चौपट कर लावण्यात आला आहे.

याशिवाय शिक्षण कर वृक्ष कर, पर्यावरण कर, रोजगार हमी कर अग्निशमन कर लावण्यात आल्याने सामान्य नागरिकालाही पाच ते आठ हजार रुपयांपर्यंत आणि दुकाने, व्यावसायिक यांना १५ ते ४० हजार घर कर आकारण्यात येणार होते.

त्यासाठी नागरिकांनी मोहाडी नगरपंचायतीवर धडक मोर्चा काढला. दरम्यान, नागरिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर पालिकेनेही नमती भूमिका घेतली. यावेळी नगराध्यक्षा छाया डेकाटे यांनी वाढीव कर पुढील कारवाईपर्यंत स्थगित करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने मोर्चेकरांनी एकच जल्लोष केला. (Latest Marathi News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

SCROLL FOR NEXT