Viral Video
Viral VideoSaam Tv

Viral Video: आजी आजोबांना अ‍ॅनिमेशनची भुरळ, व्हिडिओने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

Viral News: एका आजीआजोबांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Published on

GrandFather Viral Video :

कोणतीही गोष्ट करायला वयाच बंधन नसतं असं अनेकजण म्हणतात. परंतु सध्याच्या काळात वयानुसार किंवा इच्छा नसल्याने आपण बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे आयुष्यात काहीच करण्याची इच्छा राहत नाही. परंतु एका आजीआजोबांनी हा समज मोडला आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करण्यात सर्वात जास्त आनंद असतो. त्यात आपल्या आवडीच्या व्यक्तीची साथ मिळाली तर अजूनच मज्जा येते. वयाची बंधन न पाळून आपल्याला आवडणारी गोष्ट करणाऱ्या या आजीआजोंबाचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे.

हा व्हायरल व्हिडिओ एका आजीआजोबांचा आहे. हे आजीआजोबा व्हिडिओत अॅनिमेटेड पात्रांची नक्कल करताना दिसत आहे. सध्या अॅनिमेटेड पात्रांचा ट्रेंड सुरू आहे. सोशल मीडियावर त्यांच्यासारखी नक्कल करुन व्हिडिओ पोस्ट करतात. असाच एक व्हिडिओ आजीआजोबांनी शूट केला आहे.

व्हिडिओत सर्वात आधी आजीआजोबा सेम टू सेम अॅनिमेटेड पात्रांची नक्कल करतात. सुरुवातीला आजोबा व्हिडिओ सुरू करतात. त्यानंतर आजी येऊन त्यांना मीठी मारते. अगदी अॅनिमेटेड व्हिडिओसारखी नक्कल ते करतात. त्यानंतर अनेक फोटो काढताना दिसत आहेत. त्याचसोबत एकदम मजेशीर हावभाव करतात. हे पाहून अॅनिमेटेड पात्र आजीआजोबांची नक्कल करतात. असं वाटतंय.

Viral Video
Diwali Special Song: आई दिवाली सफाई ओ रामजी; दिवाळी स्पेशल गाण्याचा VIDEO व्हायरल

@shhuushhh या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आजीआजोबांच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. आजीआजोबांनी नक्कल केलेली ही पात्र झूटोपिया (zootopia) या चित्रपटातील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com