एफआरपीचे ४०० रुपये देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आक्रोश यात्रा सुरू केली आहे. मात्र, या वर्षीचे ऊस हंगाम सुरू होण्याच्या मार्गावर असतानाही साखर कारखानदारांनी अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शेतकरी संघटनेचे आंदोलन चिघळले आहे. एका बाजूला ऊस तोडणी करणाऱ्या आणि वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर्सची तोडफोड तर दुसऱ्या बाजूला साखर कारखानदारांच्या घरात जाऊन खर्डा-भाकरी देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन सुरू आहे.
दरम्यान राजाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार अमल महाडिक यांच्या निवासस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पोहोचले आहेत. अमल महाडिक यांना खर्डा-भाकरी देऊन कार्यकर्ते दिवाळीच्या शुभेच्छा देणार आहेत. यावेळी राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांना खरडा-भाकरी देण्यात आली. महादेवराव महाडिक यांनी आंदोलकांसोबत खर्डा-भाकरी खात चर्चा केली. जवाहर साखर कारखान्याचे चेअरमन आमदार प्रकाश आवाडे यांनाही आंदोलकांनी खर्डा-भाकरी खायला लावली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील उसाला चारशे रुपयांचा भाव मिळावा यासाठी आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी आंदोलन तीव्र होत आहे. मात्र कारखानदार त्याला जुमानत नाहीत म्हणूनच राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक साखर कारखान्याच्या चेअरमनच्या दारात खर्डा भाकरी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार नाही म्हणूनच सर्व कारखानदारांना खरडा भाकरी देण्याचं आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
त्या पार्श्वभूमीवर आज करवीर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या शिरोलीतील निवासस्थानी खर्डा भाकरी देऊन आंदोलन केले. विशेष म्हणजे महादेवराव महाडिक यांनी स्वतः शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत त्यांची खरडा भाकरी स्वतःही खाल्ली आणि कार्यकर्त्यांनाही भरवली. तसेच मागील काही वर्षात राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची ऊस दराची कोंडी आपणच फोडली असल्याचे सांगितलं. तसेच आपणही शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.