Bhandara Accident News  Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेल्या तरुणाला चिरडले

Bhandara Accident News : भंडारा जिल्ह्यातील तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर माडगी गावाजवळ भीषण अपघात झाला. टरबूज खरेदी करत असलेल्या युवकाला भरधाव कोळसा ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Alisha Khedekar

  • माडगी गावाजवळ भरधाव कोळसा ट्रकने युवकाला चिरडले

  • दिनेश योगराज ओके यांचा जागीच मृत्यू झाला

  • युवक टरबूज खरेदी करण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबला होता

  • पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली

शुभम देशमुख, भंडारा

भंडारा जिल्ह्यातील तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. माडगी गावाजवळ रस्त्याच्या कडेला टरबूज खरेदी करत असलेल्या एका युवकाला भरधाव कोळशाने भरलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला असून, हा अपघात इतका भीषण होता की युवकाच शरीर छिन्नविछिन्न झालं. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश योगराज ओके असे मृत युवकाचे नाव आहे. दिनेश काही कामानिमित्त तुमसर-गोंदिया मार्गाने प्रवास करत होता. दरम्यान, माडगी गावाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या एका टरबूज विक्रेत्याकडे तो टरबूज घेण्यासाठी थांबला होता.

टरबूज खरेदी सुरू असतानाच, मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कोळशाने भरलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रकने थेट दिनेशला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दिनेश ट्रकच्या चाकाखाली सापडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. काही काळ महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजितदादांच्या राष्ट्रवादीत धूसफूस? राष्ट्रवादीच्या बैठकीला पटेलांची दांडी

Maharashtra News Live Update: हिंगोलीच्या गोरेगाव परिसरातील ओढ्याला अवकाळी पावसामुळे पूर

Pune Crime: पुण्यात उच्चभ्रू सोसायटीत वेश्या व्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली; ४ परदेशी तरुणींनी नको त्या अवस्थेत पकडलं

निवडणुकीआधी पेटलं 'हलाल' राजकारण? गोकुळचा हलाल सर्टिफिकेटचा वाद कशाला?

3 महिन्यात गेल्या दीड लाख नोकऱ्या, आयटी कंपन्यांकडून नोकरकपात

SCROLL FOR NEXT