Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : स्टिअरिंग लॉक झाले अन् चहाच्या टपरीत शिरला ट्रॅक्टर; दोन जण गंभीर जखमी

Bhandara News : स्टेशनटोली परिसरातून महामार्गाने ट्रॅक्टर भरधाव वेगात जात असताना अचानक स्टेरिंग लॉक झाल्याने चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला. ट्रॅक्टर सरळ दिशेने जात असल्याने चालक देखील गोंधळून गेला

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: महामार्गावरून भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रॅक्टरचे स्टिअरिंग अचानक लोक झाले. यानंतर चालकांकडून ट्रॅक्टर नियंत्रित न झाल्यामुळे ट्रॅक्टर थेट महामार्गालगत असलेल्या चहाच्या दुकानात शिरले. यात दुकानावर असलेले दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सदरची घटना तुमसर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील स्टेशनटोली शिवारात घडली आहे. 

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात स्टेशनटोली शिवारात झालेल्या अपघातात टपरीत बसलेल्या तरुण लक्ष्मण हलमारे (रा. खापा) व ट्रॅक्टर चालक श्रावण भिवगडे (रा. तुडका) गंभीर जखमी झालेल्या दोघांचे नवे आहेत. माहितीनुसार स्टेशनटोली परिसरातून महामार्गाने ट्रॅक्टर भरधाव वेगात जात होते. यावेळी अचानक स्टेरिंग लॉक झाल्याने चालकाचा ट्रॅक्टर वरील ताबा सुटला. ट्रॅक्टर सरळ दिशेने जात असल्याने चालक देखील गोंधळून गेला होता. 

पान व चहाच्या टपरीला ट्रॅक्टरची धडक 

भरधाव वेगात असलेले ट्रॅक्टर महामार्गाच्या कडेला असलेल्या दिलीप वाघमारे यांच्या पान व चहा टपरीत शिरला. यावेळी टपरीत बसलेला युवक ट्रॅक्टरच्या धडकेत गंभीर जखमी झाला आहे. तसेच टपरी समोर उभ्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले. तर ट्रॅक्टर चालक देखील जखमी झाला आहे. टपरीला जोरदार धडक बसल्याने मोठा आवाज झाला. यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले होते. 

जखमी दोघांना रुग्णालयात केले दाखल 

दरम्यान अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत पान टपरीतील गंभीर जखमी युवक व ट्रॅक्टर चालकाला बाहेर काढले. यानंतर रुग्णवाहिकेला तात्काळ संपर्क साधून बोलावण्यात आले. दोघा जखमींना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना भंडारा येथे रेफर करण्यात आल्याची माहिती आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिंदे की ठाकरे, धनुष्यबाण कुणाचा? पालिका निवडणुकीत कुणाचं टेन्शन वाढणार?

Mohammed Siraj : चेंडू बॅटला लागून स्टंपवर आदळला, इंग्लंडला शेवटची विकेट मिळाली अन् सिराजला मैदानावरच रडूच कोसळलं

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; ११ आरोपींविरोधात १,६७० पानी दोषारोपपत्र दाखल, कुणावर काय आरोप?

प्रविण गायकवाडांवरील हल्ल्यामागे कुणाचा हात? ठाकरे सेनेकडून काटेचे फोटो पोस्ट

Eknath Shinde News : मला कारवाईचा बडगा उगारायला आवडणार नाही, पण...; एकनाथ शिंदे यांचा आमदारांना कडक इशारा

SCROLL FOR NEXT