Smoke-filled room tragedy in Belgaum: three dead, one critical after bonfire fumes. saamtv
महाराष्ट्र

Shocking: बेळगावात भयंकर घडलं! घरातलं ऑक्सिजनचं संपलं, शेकोटीनं घेतला तिघांचा जीव

Belgaum Bonfire Three Died: बेळगावमध्ये एक दुःखद घटना घडली. एका घरात झोपी गेलेल्या तीन तरुणांचा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झालाय. या तीन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे.

Bharat Jadhav

  • चार तरुणांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी खोलीत कोळशाची शेकोटी पेटवली.

  • धूरातील कार्बन मोनोक्साइडमुळे श्वसनमार्ग बाधित झाला असावा असा संशय व्यक्त केला जातोय.

  • तीन तरुणांचा धूर गुदमरल्याने मृत्यू झाला.

राज्यभरात कडाक्याची थंडी पडू लागलीय. अनेक ठिकाणी तापमान १० अंशांच्या खाली गेलंय. थंडीत शरीर उबदार ठेवण्यासाठी नागरिक शेकोटी पेटवत असतात. परंतु या शेकोटीनं तिघांचा जीव घेतलाय. ही भयानक घटना बेळगावमध्ये घडलीय. घरात गुदमरून तीन जणांचा मृत्यू झालाय तर एकची प्रकृती गंभीर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरातील ऑक्सिजन संपल्यानं तीन तरुणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. हे चौघं तरुण कार्यक्रमावरून घरी आले होते. थंडीमुळे त्यांनी खोलीत कोळशाची शेकोटी पेटवली आणि झोपून गेले. थंडीत उबदार राहण्यासाठी ते चोघेही कोळशाच्या शेकोटीजवळ झोपले. पण रात्रीतून अघटित घडलं. खोलीत संपूर्ण धूर झाल्यानंतर तेथील ऑक्सिजन संपलं, त्यात या तिघांचा मृत्यू झालाय. तर एकाची प्रकृती गंभीर आहे.

हे तरुण झोपी गेल्यानंतर खोलीत त्यांचा श्वास गुदमरला असावा असा संशय व्यक्त केला जातोय. रिहान मते (२२), मोहिन नालाबांडा (२३), सरफराज हरप्पनहल्ली, (२२) रहिवासी अमन नगर,अशी तिघांची नावे आहेत. शाहनवाज (१९) याची स्थिती गंभीर आहे. आमदार आसिफ सेठ यांनी घटनास्थळी भेट दिली असून त्यांनी तेथील पाहणी केली. घटनास्थळी मालमारुती पोलीस स्टेशमधील पोलीस कर्मचारी दाखल झालेत. त्यांनी पंचनामा करून तपास सुरू केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंनी फटकारल्यानंतर 'पिट्या भाई' दुसरीकडेच फिरले; रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश

Crime: पप्पा मला सोडा..., फावडा डोक्यात टाकत मुलाला संपवलं; सुनेच्या प्रेमात वेडा झालेल्या सासऱ्याचं भयंकर कृत्य

कोल्हापुरात राजकारण फिरलं, हसन मुश्रीफ-समरजीत सिंह घाटगेंची युती; कट्टर विरोधक एकत्र कसे आले? VIDEO

Delhi Blast: मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अल-फलाहच्या संस्थापकाला अटक; दिल्ली बॉम्बस्फोटांनंतरची मोठी कारवाई

Ajit Pawar : अजित पवारांच्या घरासमोर अघोरी प्रकार; थेट उपमुख्यमंत्र्यांना वशीकरण करण्याचा प्रयत्न? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT