Pune News: पुण्यात कडाक्याची थंडी; पण शेकोटीला बंदी, महापालिकेचा अजब निर्णय

PMC Orders Ban on Open Bonfires in Pune: पुणे महानगरपालिकेने हिवाळ्यात उघड्यावर शेकोटी जाळण्यावर बंदी घालण्याचा कडक आदेश जारी केलाय. वाढत्या PM2.5 आणि PM10 च्या पातळीमुळे दमा आणि श्वसनाच्या समस्यांसह आरोग्य धोके निर्माण होत आहेत , त्यामुळे महापालिकेनं हा निर्णय घेतलाय.
PMC Orders Ban on Open Bonfires in Pune:
PMC bans open bonfires in Pune citing pollution and rising winter health risks.saam tv
Published On

राज्यात थंडीची लाट पसरली आहे. अनेक ठिकाणचं तापमान १० अंशाच्या खाली गेलंय. अशा हुडहुडत्या थंडीपासून स्वताःचा बचाव करण्यासाठी नागरीक उबदार कपडे, हिटर तर कुठे शेकोटी पेटवत असतात. पुणे शहरातही कडाक्याची थंडी पसरलीय. मात्र तेथे महापालिकेनं शेकोटी पेटवण्यास मनाई केली आहे. पुण्यात थंडी वाढलेली असताना महापालिका प्रशासनाने हा अजब निर्णय घेतलाय.

पुणे शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुले तसेच निवासी परिगरांमध्ये रात्रीच्या वेळी सुरक्षा कर्मचारी थंडीपासून बचाव करण्यासाठी उघड्यावर शेकोट्या पेटवताना लाकूड, कचरा किया कोळसा जाळतात. यामधून निर्माण होणाऱ्या थुरांमुळे पुणे शहरातील हवा प्रदूषण वाढत आहे. हवा प्रदूषणामुळे न केवळ वातावरणामध्ये बदल होत असतात. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो.

PMC Orders Ban on Open Bonfires in Pune:
Pune News: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! खासगी बसेससाठी नवे नियम लागू, मार्ग आणि थांब्यांमध्ये मोठे बदल; वाचा नियमावली

त्यात शेकोट्या पेटवल्यामुळे धूर, कार्बन मोनोऑक्साइड पीएम 10. पीएम 20.5 आणि अन्य हानिकारक वायूंचे उत्सर्जन होऊन श्वसनावर परिणाम होतो. यामुळे दमा, अस्थमा आणि इतर श्वसनाच्या रोगांचा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे, शेकोटी पेटवण्यास निर्बंध घालण्यात आलेत. शहरातील हवा गुणवत्तेत सुधारणा करणेसाठी केंद्र तसेच राज्य शासनाने हवा प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी विविध कायदे आणि नियम बनवले आहेत.

PMC Orders Ban on Open Bonfires in Pune:
Pod Taxi Project: ठाणे,नवी मुंबई, मीरा-भाईंदरमध्ये धावणार पॉड टॅक्सी; प्रकल्पाला सरकारची मंजुरी

त्याच अनुषंगाने पुणे महापालिका आयुक्तांनी महत्वाचा निर्णय घेतलाय. शहरातील सोसायटीच्या परिसरात किंवा रस्त्यावर शेकोटी पेटवून उघड्यावर कोळसा /जैविक पदार्थ (बायोमास) / प्लास्टिक / रबर आणि इतर कचरा जाळून धूर निर्माण केला. कोणत्याही गृहनिर्माण संकुलातील वॉचमन, सफाई कामगार आणि इतर कामगार व्यक्ती, मनपा कर्मचारी किंवा कंत्राटी कामगार किंवा मनपा ठेकेदाराकडील नियुक्त कंत्राटी कामगार या नियमांचे उल्लंघन करताना आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com