Belgaum Latest News मिलिंद देसाई
महाराष्ट्र

Belgaon Border Dispute: बेळगावात मराठी बांधव उतरले रस्त्यावर; संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणला

Belgaon Border Dispute: भाषिक प्रांत रचना करताना झालेल्या अन्यायाविरोधात हजारो मराठी भाषिक मंगळवारी रस्तावर उतरले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मिलिंद देसाई

Belgaum Latest News: महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यातल्या सीमावाद आणि बेळगाव जिल्ह्याचा वाद अजूनही कायम आहे. भाषिक प्रांत रचना करताना झालेल्या अन्यायाविरोधात हजारो मराठी भाषिक मंगळवारी रस्तावर उतरले होते. यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाविरोधात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते. (Samyukta Maharashtra Movement News)

या आवाहनाला प्रतिसाद देत लहानग्यांपासून ते वयावृद्ध सर्वचजण मोठया संख्येने सहभागी झाले होते. तसेच बेळगाव (Belgaon) कारवार निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र मैं नहीं तो जेल मैं, जय भवानी जय शिवाजी आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. 66 वर्षानंतरही महाराष्ट्रात जाण्याची इच्छा तीव्र असल्याचे या फेरीतून दिसून येत आले आहे. (Belgaon Border Dispute)

सकाळी नऊ वाजता या फेरीला सुरुवात झाली. यावेळी काळ्या दिनाच्या फेरीत काळे टी शर्ट, काळे कपडे घालून लोकं सहभागी झाले आहेत. त्यामुळे समितीची ताकद पुन्हा एकदा दिसून आली आहे. यावेळी शहराच्या विविध भागातून फेरी काढण्यात येणार आहे, त्यानंतर मराठा मंदीर येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT