Beginning of the second phase of Malegaon Magic Pattern Saam Tv
महाराष्ट्र

Malegaon Corona Update : मालेगाव मॅजिक पॅटर्नच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात

Malegaon Magic Pattern : रुग्णसंख्या नियंत्रणात असल्यानं कोरोना मुक्तीचा मालेगाव पॅटर्न (Malegaon Corona Update) चर्चेत आला होता.

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक: मालेगाव मॅजिक पॅटर्नच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून (गुरुवारपासून) सुरुवात झाली आहे. देशभरात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना मालेगावात मात्र रुग्णसंख्या नियंत्रणात असल्यानं कोरोना मुक्तीचा मालेगाव पॅटर्न (Malegaon Corona Update) चर्चेत आला होता.

मालेगावमधील कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणाचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी जानेवारीपासून झालेल्या ऑपरेशन मालेगाव मॅजिक सर्व्हेतून आश्चर्यजनक माहिती पुढे आलीय. मालेगावातील ९६ टक्के नागरिकांमध्ये १०० टक्के रोगप्रतिकारक शक्ती आढळून आलीय.

दांडग्या रोगप्रतिकारक शक्तिमुळेच मालेगावात कोरोनाच्या डेल्टा आणि ओमायक्रॉनसारख्या विषाणूचा प्रादुर्भाव दिसून आला नाही. या मालेगाव मॅजिक सर्व्हेसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि मालेगाव महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने शहरातील २० वॉर्डातील २ हजार ७३५ नागरिकांचे रक्ताचे नमुने गोळा केले होते. या नमुन्यांच्या तपासणीतून ही माहिती समोर आली. आज मालेगाव मॅजिक पॅटर्नच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झालीय.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत शहरात रुग्णसंख्या नियंत्रणात राहिल्याने मालेगाव पॅटर्न राज्यभर चर्चेत आला होता. शहराच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आरोग्य विज्ञान विद्यापीठाने अभ्यास सुरू केला आहे. जानेवारी महिन्यात तत्कालीन जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. माधुरी कानिटकर, मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत एका सर्व्हेचे नियोजन केले होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Decision: मोठी बातमी! आता या लोकांचं जन्म-मृत्यू प्रमाणपत्र होणार रद्द; सरकारने घेतला मोठा निर्णय

नागपूरमध्ये कंत्राटदाराची आत्महत्या, शरद पवारांच्या नेत्याला ठोकल्या बेड्या, विदर्भाच्या राजकारणात खळबळ!

Jio ₹189 vs Jio ₹198: जिओ १८९ आणि १९८ प्लॅनमधून सर्वोत्तम कोणता? जाणून घ्या

Scholarship News: शिष्यवृत्तीसाठी सरकारचा मोठा निर्णय! लाखो विद्यार्थ्यांना होणार फायदा | Video

Pune Crime : पुणे पुन्हा हादरलं! मध्यरात्री ५ जणांचा गोळीबार, निलेश घायवाळ टोळीकडून फायरिंग

SCROLL FOR NEXT