Beed to Ahilyanagar railway line inaugurated — check fare and station details of the new route. saam tv
महाराष्ट्र

Beed–Ahilyanagar Train: बीड ते अहिल्यानगरच्या रेल्वेचं प्रवास भाडे किती? रेल्वे मार्गावर एकूण स्टेशन किती?

Beed–Ahilyanagar Train Service: बीड-अहमदनगर मार्गावर पहिली ट्रेन धावली. नवीन रेल्वे मार्गावरील तिकिटाचे भाडे, अंतर आणि स्थानकांची संपूर्ण यादी येथे वाचा.

Bharat Jadhav

  • बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्गावर पहिल्यांदाच रेल्वे धावली.

  • १६७ किमी अंतराचा हा प्रवास असून अनेक स्टेशनांचा समावेश आहे.

  • बीडकरांसाठी ही ऐतिहासिक आणि सोयीची रेल्वे सेवा ठरणार आहे.

बीडकरांसाठी ऐतिहासिक घटना घडलीय. बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्गावर बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्गावर आज पहिल्यांदा रेल्वे धावली. मंत्री महोदयांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रेल्वेने आपला प्रवास सुरू केला. बीड-अहिल्यानगर-परळी मार्गावर ही रेल्वे धावणार आहे. पहिल्या टप्प्यात आज बीड ते अहिल्यानगर या १६७ किमी मार्गावर रेस्वे धावेल. बीड ते अहिल्यानगरच्या प्रवासासाठी किती भाडे असणार, कोणते आणि किती स्टेशन या मार्गावर असणार याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ.

या मार्गावरील प्रवासासाठी कमीत कमी १० रुपये ते जास्तीत जास्त ४० रुपयांपर्यंतचे तिकीट दर आकारण्यात येणार आहे. म्हणजेच काय तर बीडहून केवळ ४० रुपयांत अहिल्यानगरला जाता येईल. बीड ते अहिल्यानगर या रेल्वे प्रवासात एकूण १५ रेल्वे स्थानक असणार आहेत. बीड-अहिल्यानगर या १६६ किमी मार्गाचा टप्पा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलाय. तर उर्वरीत बीड-परळी टप्प्यातील काम अजून बाकी आहे.

बीड रेल्वे स्टेशन कुठे आहे?

बीडचे नवे रेल्वे स्टेशन हे बीड बस स्टँडपासून ६ किलोमीटर दूर असलेल्या पालवण गावात आहे. बीड शहरापासून ६ किमी दूर रेल्वे स्टेशन असणार असल्यानं रिक्षावाले प्रवाशांकडून जास्त भाडे घेतील. त्यामुळे पूर्ण प्रवासाला ४० रुपये भाडे असले तरी स्टेशन दूर असल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रेल्वेची वेळ काय?

बीड-अहिल्यानगरचा प्रवास रस्त्याने केला तर बायपास रोडने अडीच ते पावणे तीन तास लागतात. या रेल्वेने किमान साडेपाच लागणार आहेत. कारण डेमू रेल्वेचा वेग ३० किमी प्रती तास असणार आहे. या मार्गावर दररोज एक गाडी येणार आहे. गाडी क्रमांक 71441, सकाळी ६.५५ वाजता अहिल्यानगरवरुन निघेल तर ती रेल्वे १२.३० वाजता बीडला पोहोचणार आहे.

तीच गाडी क्रमांक 71442, दुपारी १ वाजता परत अहिल्यानगरसाठी जाईल. सायंकाळी साडेसहा वाजता ही रेल्वे अहिल्यानगरला पोहोचणार आहे. आठवड्यातील सहा दिवस ही रेल्वे धावणार आहे. ही रेल्वे १६७ किमीचे अंतर कापणार आहे. त्यामध्ये बीडसह एकूण १५ स्थानकांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nilesh lanke News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची गरज; मालेगाव प्रकरणावर खासदार नीलेश लंकेंची प्रतिक्रिया

Team India Announcement: टीम इंडियाचा कर्णधार बदलला; ODI सीरिजसाठी नव्या संघाची घोषणा

सकाळी नाश्ता करताना अस्वस्थ वाटलं, नंतर हृदयविकाराचा झटका; स्मृती मानधनाच्या वडिलांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Kolhapur Politics: चाणक्यांमुळेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; मुश्रीफ-घाटगेंची युती घडवण्यात फडवणीसांचा हात

Maharashtra Live News Update: शिंदेसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT