beed, zilla parishad, jal jeevan mission
beed, zilla parishad, jal jeevan mission saam tv
महाराष्ट्र

Saam Impact : जल जीवन मिशन भ्रष्टाचार प्रकरण; जिल्हा परिषदेच्या अधिका-यांसह कर्मचा-यांना शिस्तभंगाची नाेटीस

विनोद जिरे

Beed : दुष्काळी बीड (beed latest news) जिल्ह्यात जल जीवन मिशन (jal jeevan mission) योजनेतील कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी बीड जिल्हा परिषदेच्या (beed zilla parishad) दहा अधिकारी आणि कर्मचाऱ्याविरोधात शिस्तभंगाची कारवाईचे आदेश काढण्यात आले आहेत. साम टीव्हीने (Saam Tv) जल जीवनमधील अनियमितता उघडकीस आणली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या दहा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित झाल्याने शासकीय कार्यालयांमध्ये खळबळ उडाली आहे.

बीड जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत तब्बल 1300 गावांमध्ये हर घर जल, हर घर नल यानुसार जल जीवन मिशन योजना सुरू करण्यात आली. मात्र यामध्ये तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रकल्प संचालक आणि अधिकारी कर्मचारी यांनी मर्जीतील लोकांना टेंडर देत कोट्यवधी रुपयांचा अपहार आरोप होत आहे.

बीड जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार (CEO Ajit Pawar) यांनी दोन उपअभियंता, जिल्हा दक्षता प्रमुख, चार शाखा अभियंता, दोन वरिष्ठ सहायक आणि एक सहायक लेखाधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत नोटीस बजावली आहे. तसेच विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.

यामध्ये उपअभियंता एस. यु. खंदारे, उपअभियंता एम आर लाड, जिल्हा दक्षता प्रमुख नामदेव उबाळे, शाखा अभियंता ए. बी. तांदळे, पी. डी. शिंदे, जी. आर. खोसे, एस. एन. सारणीकर, वरिष्ठ सहायक व्ही. डी. आनेराव, एस. बी. चव्हाण आणि सहायक लेखाधिकारी बी. टी. वीर यांना शिस्तभंगाची कारवाई बाबत नोटीस बजावण्यात आली आहे.

या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी ठराविक गुत्तेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी नियमबाह्य पध्दतीने काम केले. शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले. टेंडरमध्ये स्थानिक आणि नातेवाईक यांना लाभ मिळावा म्हणून बदल केले. (Breaking Marathi News)

आपल्याच नातेवाईक यांना शंभर ते दोनशे कोटींचे कामे वाटप केली. ठराविक गुत्तेदारांना लाभ देण्यासाठी तीन पेक्षा अधिक कामांचे वाटप केले. आपल्या पदाचा दुरुपयोग करून शासनाचे नुकसान केले असे दोषारोप संबंधितांवर ठेवण्यात आले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा ११ वर्षांनंतर निकाल; तावडे, भावे आणि पुनाळेकर निर्दोष

Narendra Dabholkar Death: नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण: दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

Chardham Yatra: आजपासून चारधाम यात्रेला सुरुवात, जाणून घ्या, केदारनाथ मंदिराचे दरवाजे किती वाजता उघडतील

Sanjay Raut : आम्हाला भाड्याने लोक आणावे लागत नाहीत; संजय राऊत यांचा राज ठाकरे यांच्या मनसेला टोला

T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर! RCB च्या शिलेदाराकडे नेतृत्वाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT