Beed Crime  Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, जेवत असताना ४० जण आले, लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करत...

Beed political violence: बीडमध्ये लक्ष्मण हाके यांच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. पवन कंवर यांच्यासह त्यांच्या ३ सहकाऱ्यांवर हा हल्ला करण्यात आला. यामध्ये चौघेही जखमी झाले आहेत.

Priya More

Summary -

  • बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या विश्वासू सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला.

  • या हल्ल्यात पवन कंवर गंभीर जखमी झाले आहेत.

  • पवन कवर यांचे ३ साथीदार किरकोळ जखमी झाले आहेत.

  • ४० ते ५० अज्ञात हल्लेखोर पवन कंवर जेवत असलेल्या हॉटेलमध्ये शिरले आणि त्यांनी मारहाण केली.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या जवळच्या सहकाऱ्यावर बीडमध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. हाके यांचे जवळचे सहकारी आणि अतिशय विश्वासू समजले जाणारे पवन कंवर आणि त्यांच्या तीन साथीदारांवर हल्ला करण्यात आला. ४० ते ५० अज्ञात व्यक्तींनी या चौघांना गाठून त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पतन कंबर आणि त्यांचे साथीदार जखमी झाले आहेत. पवन कंवर हे गंभीर जखमी आहेत. या सर्वांवर माजलगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या सावरगावजवळ मंगळवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जेवण करण्यासाठी पवन कंबर आणि त्यांचे तीन साथीदार सावरगाव येथील एका धाब्यावर गेले होते. हे चौघेही जेवण करत असताना अचानक ४० ते ५० जण तिथे आले. या सर्वांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. लाठ्या-काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी या चौघांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत पवन कंवर हे गंभीर जखमी झाले. तर त्यांचे साथीदार किरकोळ जखमी झाले.

जखमी झालेल्या चौघांनाही माजलगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या हल्ल्यात पवन कंवर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर त्याच्या साथीदारांना चांगलाच मुक्कामार लागला आहे. चौघांवर देखील डॉक्टरांची टीम उपचार करत आहे.

या घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बालक कोळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनीच या सर्वांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले. पोलिस येईपर्यंत सर्व आरोपी फरार झाले होते. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato chutney Recipe : चमचाभर टोमॅटोची चटणी जेवणाची रंगत वाढेल, वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बाहुले झाले आहे का? जयंत पाटलांची टीका

Rava Khobra Ladoo Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी रवा खोबरं लाडू

Raj Thackeray : ...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Recruitment : मुंबई महापालिकेत नोकरीची संधी; पगार ३०,००० रुपये; आजच करा अर्ज

SCROLL FOR NEXT