Beed Flood News : एनडीआरएफ पथकाची कौतुकास्पद कामगिरी, भर पावसात नवजात बाळ आणि महिलेची केली सुखरूप सुटका

Beed Heavy Rain : महाराष्ट्रातील बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात एनडीआरएफ जवानांनी रात्रभर अथक परिश्रम करत नागरिकांचा जीव वाचवला. यामध्ये एनडीआरफ पथकाने एका नवजात बाळाला आणि महिलेला यशस्वीरीत्या वाचवले आहे.
Beed Flood News : एनडीआरएफ पथकाची कौतुकास्पद कामगिरी, भर पावसात नवजात बाळ आणि महिलेची केली सुखरूप सुटका
Beed Flood NewsSaam Tv
Published On
Summary
  • राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे.

  • सलग ७-८ दिवस सुरु असलेल्या पावसाने बीड, धाराशिव, सोलापूर, संभाजीनगर जिल्ह्यांना झोडपले.

  • जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून एनडीआरएफकडून पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याचे काम सुरु आहे

  • बीडमध्ये पुरस्थितीतून नवजात बालकासह एका महिलेला सुखरुप बाहेर काढण्यात यश

महाराष्ट्रातील अनेक भागांत सलग पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या विनंतीवरून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल (NDRF) ची पथके बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आली. एनडीआरएफच्या जवानांनी रात्रभर अथक परिश्रम करून बचावकार्य हाती घेतले. या बचावकार्यादरम्यान एनडीआरएफ जवानांनी एका नवजात बाळाची आणि एका महिलेची सुखरूप सुटका केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पावसाने राज्यात घातलेल्या थैमानामुळे ठिकठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच अनेक घरात पाणी शिरले आहे. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. धरणं तुडुंब भरून वाहू लागली आहेत. पूरस्थितीत अडकल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ पथक दिवस रात्र काम करत आहे. बीड जिल्ह्यात सलग ७-८ दिवस पडलेल्या धोधो पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे.

Beed Flood News : एनडीआरएफ पथकाची कौतुकास्पद कामगिरी, भर पावसात नवजात बाळ आणि महिलेची केली सुखरूप सुटका
Maharashtra Rain: नागरिकांनो काळजी घ्या! पुढचे ५ दिवस राज्यात धो-धो, पुणे-नाशिकसाठी पुढचे ३ तास महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

अशातच बीड जिल्ह्यामधील मजलगाव तालुक्यातील संडास चिंचोले येथे एनडीआरएफच्या पथकाने रात्रभर चालवलेल्या मोहिमेत आज सकाळी एका नवजात बालकासह एका महिलेचा सुरक्षित बचाव करण्यात आला. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील विविध भागांतून 26 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

Beed Flood News : एनडीआरएफ पथकाची कौतुकास्पद कामगिरी, भर पावसात नवजात बाळ आणि महिलेची केली सुखरूप सुटका
Maharashtra Politics: जळगावात भाजपकडून ठाकरेंना दे धक्का, १५ शिलेदारांनी सोडली साथ; 'कमळ' हाती घेणार

धाराशिव जिल्हा मध्ये सुद्धा कपिलापुरी गावात पाण्याने वेढलेल्या 9 नागरिकांना एनडीआरएफने रात्रभर सुरू असलेल्या प्रयत्नांतून सुरक्षित बाहेर काढले. सोलापूर जिल्ह्यात एनडीआरएफ पथकाने पूर्ण रात्र अविरत काम करत 59 नागरिकांचा जीव वाचवला. दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. मात्र पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com