A youth’s fingers chopped off by friends in Beed over a viral video; rising violence sparks fear among locals. Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: बीडचं बिहार होतंय? मित्रानेच मित्राची बोट छाटली

Beed Turning Into Bihar: बीडमधील वाढत्या गुन्हेगारीमुळे बीडचा बिहार होतोय का? असा सवाल उपस्थित केला जातोय. बीडमधील एका तरुणासोबत असं काय घडलं की ज्यामुळे बीड पुन्हा एकदा हादरलयं?

Omkar Sonawane

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या बीडमधील गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नाहीये.. शहरातल्या तेलगाव नाका परिसरातील अनिस नावाच्या तरुणाची बोटं त्याच्या मित्रांनीच छाटल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. तीन दिवसांपूर्वी कोयता आणि सत्तुरने काहीजण अनिसला धमकावत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी अनिसनं मित्रांना जाब विचारल्यानंतर त्यांनी त्याची बोटच छाटून टाकली...

दरम्यान आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.गेल्या महिन्याभरात बीडमधील मारहाणीच्या घटना पाहिल्यास बीडचा बिहार होत चाललाय का असा प्रश्न पडत आहे.

बीडमधील मारहाणीच्या घटना

11 जुलै 2025

पिंपरीत शेत जमिनीच्या वादावरून माजी सरपंचाकडून तरुणास बेदम मारहाण

12 जुलै 2025

उसनवारी दिलेले पैसे परत मागितल्यानं महिलेला मारहाण

18 जुलै 2025

बीडच्या बहिरवाडी परिसरातील व्यक्तीला मारहाण

24 जुलै 2025

तेलगाव नाक्याजवळ कोयता आणि सत्तूरची धमकी देत तरुणाला मारहाण

बीडमधील खून, दरोडा, विनयभंगासारख्या घटना ताज्या असताना मित्रानेच मित्राची बोटं छाटल्यानं बीडमध्ये पुन्हा एकदा दहशतीचं वातावरण पसरलयं. त्यामुळे पोलिस प्रशासनाचा कुठलाच धाक गुन्हेगारांना राहिला नाहीय का? बीडचा बिहार होत असताना गुन्हेगारांना अभय कोण देतयं? बीडमधील गुन्हेगारीची पाळमुळं उघडून टाकणं राज्य सरकारला कधी जमणार? संतोष देशमुख, महादेव मुंडे असे कितीजणांचे जीव गेल्यावर यंत्रणेला जाग येणार असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT