Minor Girl Harassed in Beed Saam TV News
महाराष्ट्र

Beed: दहावीच्या मुलीची भररस्त्यात छेड; पालकांनी टवाळखोराला शिकवली अद्दल

Minor Girl Harassed in Beed: केज तालुक्यात शाळेच्या वाटेवर अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची घटना उघड. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Bhagyashree Kamble

बीडमध्ये गुन्हेगारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच आणखी एका घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीकडून शालेय मुलींची छेड काढण्याचा प्रकार समोर आला आहे. छेड काढल्यानंतर आरोपी मुलींना संपवून टाकण्याची धमकी देत होता. या प्रकाराला कंटाळून पीडितेच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीनुसार, आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

ऋषिकेश उर्फ सचिन गलांढे असे आरोपीचे नाव आहे. हा तरूण वारंवार शाळकरी मुलींची छेड काढायचा. शाळेच्या वाटेवर उभे राहून मुलींचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करायचा. घटनेच्या दिवशी त्यानं एका मुलीची भररस्त्यावर छेड काढली. मुलीने आपल्या पालकांना याची माहिती दिली.

यानंतर संतप्त पालकांनी शिक्षकांना याची माहिती दिली. मुलीच्या आई आणि शिक्षकांनी संबंधित आरोपीला समज दिली. मात्र, तरीही आरोपी मुलींची छेड काढत होता. छेड काढल्यानंतर मुलींना धमकी द्यायचा. 'कुणाला सांगितलंस तर तुला खल्लास करीन' अशी धमकी देत असल्याचं समोर आलं आहे.

मुलीला वारंवार त्रास देणं थांबवलं नसल्यामुळे, मुलीच्या पालकांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीच्या पालकांनी केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, गेल्या १५ दिवसांत केज पोलीस ठाणे हद्दीत विनयभंग, बलात्कार आणि छेडछाडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या प्रकारांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप प्रणित NDAला मोठा हादरा; घटक पक्षातील प्रमुख नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची कारला धडक, २ जवानांसह ५ जणांचा मृत्यू

Dudhi Bhopla Sweet Dish : दुधी भोपळ्याचा हलवा तर खाल्ला असाल, मग एकदा ट्राय करा 'ही' स्वीट डिश

WTC Points Table : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारूण पराभवाचा भारताला जबरदस्त धक्का, WTC शर्यतीत पाकिस्ताननंही टाकलं मागे

CM Devendra Fadnavis: बॉम्बे की मुंबई? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, VIDEO

SCROLL FOR NEXT