बीड बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश; पाहा Video  Saam Tv
महाराष्ट्र

बीड बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश; पाहा Video

चौकशीत कुठलाही कसुर ठेऊ नका असे शंभुराज देसाई म्हणाले आहेत.

विनोद जिरे

बीड- साम टिव्हीच्या बातमीनंतर बीडच्या पोलिस अधिक्षकांना गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी फोन करुन कारवाईचे आदेश दिले आहेत. घटनेची निपक्षपाती चौकशी करा चौकशीत कुठलही राजकारण होऊ देऊ नका जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करा असे आदेश शंभुराज देसाई यांनी दिले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांबाबत झालेल्या आरोपावर देखील चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीत कुठलाही कसुर ठेऊ नका असे शंभुराज देसाई म्हणाले आहेत.

बीडमधील अल्पवयीन पीडितेची आपबीती;

अंबाजोगाई तालुक्यातील 1 वर्षीय अल्पवयीन मुलीवर फुटपाथवर जिवण जगण्याची वेळ आली आहे. अनेकांनी तिच्यावर अत्याचार करुन शरीराचे लचके तोडले आहेत. अल्पवयीन मुलीने पोलीसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की माझे वडील व माझा भाऊ तालुक्यातील गावात रहातो. माझी आई मी 8 वर्षाची असताना मयत झालेली आहे. माझे 5-7 वी पर्यंतचे शिक्षण वसुंधरा प्राथमिक विदयालय चनई येथे शिक्षण झाले. तेव्हा मी सावित्रीबाई फुले मुलींचे वसतीगृह चनई येथे राहत होते. 7 वी नंतर मला माझे वडीलांनी माझे गावी नेले. त्यानंतर लगेच अंदाजे 19.5.2018 रोजी, मी 13 वर्षाची असताना माझ्या वडीलांनी माझे बळजबरीने विशाल भागवत सोमवंशी (वय -33 वर्षे रा - धारुर ता.जि - बीड) याच्याशी घाटनांदुर ता - अंबाजोगाई येथे लग्न लावले. माझ्या लग्नाला माझा नवरा विशाल भागवत सोमवंशी, नणंद सोनाली सुरवसे, तसेच माझे वडील अशोक सोळंके, भाऊ सुरज अशोक सोळंके तसेच माझा मोठा चुलता रामचंद्र, लहान चुलती राणी सुरेश सोळंके व घाटनांदुर येथील ब्राम्हण व इतर काही लोक लग्नाला हजर होते .

लग्नानंतर मी, माझी आजी सासु असे अंबाजोगाई येथे राहत होतो. त्यावेळी माझा नवरा धारुर येथे कामाला जात होता व माझा नवरा अधुनमधुन धारुर वरुन येत असे. तेव्हा आमच्यात शारिरीक संबंध येत होते. माझा नवरा अधुनमधुन मला हाताच्या चापटीने मारहाण देखील करत होता. म्हणुन मी 14 जानेवारी 2019 रोजी रागाने माझे माहेरी आले व तेथेच वडील व भाऊ यांच्याबरोबर राहु लागले . मी माहेरी राहत असताना माझे वडील मला म्हणत असे की, तु तुझा नवरा सोडुन आमच्याकडे का राहायला आलीस. "नवरा नको वाटतो तर ये माझे जवळ"असे म्हणुन लैंगिक संबंधासाठी माझे शरीराला स्पर्श करीत होते. हाताच्या चापटीने मारहाण देखील करत होते. म्हणुन त्यांना कंटाळुन मी घरातुन निघुन अंदाजे जुन 2021 पासुन अंबाजोगाई येथील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या बसस्टॉपवर राहत आहे. व भीक मागून उपजिवीका भागवत आहे.

मी एकटी राहते याचा गैर फायदा घेऊन अंबाजोगाई येथील ज्ञानदीप अँकडमी येथील हरी व ऋषी यांनी 15 दिवसापुर्वी जेवायला देतो, असे म्हणुन आडस रोडला मोकळ्या जागेत माझेवर दोघांनी मिळुन बळजबरीने बलात्कार केला. आरोपी हरी दराडे रा. गावदंरा ता धारूर व ऋषीकेस दत्तात्रय सांगळे रा. चाडगाव ता. धारूर यांनी माझेवर बलात्कार केला म्हणुन मी ग्रामीण पोलिस ठाणे अंबाजोगाई येथे येवुन कायदेशीर तक्रार दिली आहे. या अल्पवयीन मुलीची माहिती सामाजिक कार्यकर्ते तत्वशिल कांबळे, मानवलोक मनस्विनी प्रकल्पचे बालाजी वाघमारे, शोभा किरवले यांना मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक नेरकर मँडम यांना भेटले. यावेळी मुलीची आपबीती ऐकून तिला धिर देत, तात्काळ सुत्रे हलवत, अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावयास लावून योग्य दिशेने तपास करावा, अशा सुचना केल्या. या गुन्हयाचा तपास पिंक पथक प्रमुख महिला पो.उपनिरीक्षक व्हि.पी.पेठकर यांनी यातील एक आरोपी ऋषीकेस दत्तात्रय सांगळे यास ज्ञानदिप अँकडमी येथून अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणी जर एखादा पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी दोषी असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. असा इशारा पोलीस अधीक्षक आर राजास्वामी यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून अनेकांची नावे वगळली, तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? चेक करा स्टेप बाय स्टेप

SCROLL FOR NEXT