बीडमध्ये वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांचा दणका विनोद जिरे
महाराष्ट्र

बीडमध्ये वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांचा दणका

थेट नदीपात्रात उतरत सात हायवांसह स्कार्पिओ केली जप्त...!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीड - गेवराई तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून, अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांना, जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकाने चांगलाच दणका दिला आहे. यावेळी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाळू वाहतूक करणाऱ्या, तब्बल सात हायवा गाड्या पकडण्यात आल्या. तर यावेळी लोकेशनसाठी वापरण्यात येणारी एक स्कार्पिओ देखील पकडण्यात आली.

हे देखील पहा -

वाळू माफियांनी गोदापात्रात नंगानाच लावला होता. याविषयी अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. याच तक्रारीच्या अनुषंगाने, स्वत: जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधीक्षक आर.राजा रामास्वामी, तहसिलदार सचिन खाडे व पोलीस अधिक्षक विशेष पथक प्रमुख विलास हजारे हे गोदावरी नदी पात्रात उतरले होते. यावेळी नदिच्या काठावर केलेल्या अनधिकृत वाळु साठा भरुन नेण्यासाठी आलेली सात हायवा व लोकेशन करत असलेली एक स्कॉर्पिओ असा जवळपास 2 कोटींचा मुद्देमाल जप्त केल्याची माहीती तहसिलदार खाडे यांनी दिली.

या ठोस कार्यवाहीने टेंडरधारकासह वाळु माफियांचे ढाबे दणाणले असून तत्कालीन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केलेल्या कार्यवाही नंतरची ही सर्वात मोठी कार्यवाही मानली जात आहे. दरम्यान जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाळू माफियांनी आपला धंदा जोरात सुरू केलेला आहे. यामुळं निसर्गाची मोठी हानी होत असल्याने अशाचं कारवाया जिल्ह्यात देखील कराव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: विठ्ठला... सरकारला सद्बुद्धी दे, मराठा आरक्षण लवकर मिळू दे, जरांगे पाटलांचे साकडे|VIDEO

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

SCROLL FOR NEXT