शासकीय आरोग्य यंत्रणा निष्क्रीय; माणुसकी गहीवरली

बाप मुलीला पाठीवर घेऊन उपचारासाठी पायी निघाला...
शासकीय आरोग्य यंत्रणा निष्क्रीय; माणुसकी गहीवरली
शासकीय आरोग्य यंत्रणा निष्क्रीय; माणुसकी गहीवरलीजयेश गावंडे
Published On

अकोला - एकीकडे शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचा दावा केला जातो. मात्र दुसरीकडे हे दावे पोकळ असल्याचे वास्तव अनेकदा समोर येते. याच आरोग्य सेवेचे पार धिंडवडे उडवल्याची संताजनक घटना पाहायला मिळाली. एक आदीवासी बाप आपल्या आजारी मुलीला उपचाराअभावी चक्क पाठीवर घेऊन जिल्ह्यातील अकोट येथून 45 कि.मी पायी अकोला घेऊन जात असल्याचे पाहून माणुसकी गहीवरली,पंरतु शासकीय आरोग्य सेवा निष्क्रीय ठरली.

अकोला Akola जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातील शहापूर येथील आदिवासी गरीब कुंटबातील 13 वर्षाची सलोनी दिनेश बारे ही मुलगी आजारी पडली. तीला अकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. या ठिकाणी उपचार करुन तीला अकोला येथे पुढील उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला कार्यरत डॉक्टरांनी देत ग्रामीण रुग्णालयमधुन सुट्टी दिली. त्यामुळे आर्थिक परिस्थितीने खालावलेला बाप चिंताग्रस्त झाला. खिशात पैसा नाही काय करावं याच विचारत असताना जिवाची घालमेल झालेल्या बापाने चक्क मुलीला पाठीवर घेऊन अकोला उपचारासाठी निघाला.

हे देखील पहा -

मुलीचे हातावर सलाईनची सुई, अंगावर ब्लॅकेट पाघरुन ग्रामीण रुग्णालय मधुन पोपटखेड रोडने जात असल्याचे चित्र बघुन राजेश चौधरी यांनी त्यांना थांबवून विचारपूस केली, असता मुलीचे बापाने डोळ्यात अश्रु तरळत सर्व घटनाक्रम सांगितला. त्यामुळे तात्काळ राजु चौधरी यांनी अँटो बोलावून बसस्थानक वर आजारी मुलगी व बापाला घेऊन गेले. याठिकाणी आर्थिक मदत देत एसटी मध्ये बसुन दिले. यावेळी एसटी वाहक नंदकिशोर देशमुख यांनी सहकार्य केले.

शासकीय आरोग्य यंत्रणा निष्क्रीय; माणुसकी गहीवरली
गुरुग्राममधील तरूणाला पहिला डोस कोव्हॅक्सिनचा तर दुसरा कोव्हिशिल्डचा!

अकोला बसस्थानक वरून अँटोमधुन अकोला येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. या घटनेची चौकशी करीत वैद्यकीय सेवा सक्षम करणे गरजेचे झाले आहे. अकोट येथे जिल्हारुग्णालय मंजुर झाले पंरतु वैद्यकीय सेवा अपयशी आहे. थेट रुग्णांना अकोला रेफर करण्यात येते. या ग्रामीण रुग्णालयाशी आदिवासी बहुल गावातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले रुग्ण नेहमीच येतात. त्यामुळे त्यांना रेफर करण्यापूर्वी त्यांची चौकशीकरीत वैद्यकीय सेवेचा व मदतीचा हात देण्याची गरज आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com