Saam Impact News Saam tv
महाराष्ट्र

Saam Impact News: ग्राहकांना गंडावणाऱ्या मल्टिस्टेट बँक अध्यक्षांसह संचालक मंडळांवर गुन्हा

ग्राहकांना गंडावणाऱ्या मल्टिस्टेट बँक अध्यक्षांसह संचालक मंडळांवर गुन्हा; १५० कोटी घेऊन अध्यक्ष पसार झाल्‍याचा आरोप

विनोद जिरे

बीड : बीडमध्ये ग्राहकांना १५० कोटींना गंडावणाऱ्या माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेट बँकेच्या अध्यक्षांसह संचालक मंडळावर अखेर साम टीव्हीच्या बातमीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ जूनला ग्राहकांनी (Beed) बीडच्या शिवाजीनगर पोलिसात तक्रार केली होती. मात्र त्याची दखल कालपर्यंत घेतली गेली नव्हती. त्यामुळे ग्राहकांनी (Police) पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या केला होता. याचीच बातमी साम टीव्हीने दाखवल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेट बँकेच्या (Bank) अध्यक्षांसह संचालक मंडळांवर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Live Marathi News)

लोकांना जास्त व्याजदराचे आमिष दाखवून बीडच्‍या माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटने ठेवीदारांकडून कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत जमा करुन घेतल्या होत्या. बँकेच्या अध्यक्षांचे पती तथा संचालक असणाऱ्या बबन शिंदे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ठिकठिकाणी प्रॉपर्टी खरेदी केली. यानंतर इतर ठिकाणी काही पैसा यातला खर्च केला. यासह विविध ठिकाणी हा वापरण्यात आला. ज्यावेळेस ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवींच्या मुदती संपल्या. त्यावेळेस ठेवीदारांना त्यांच्या रक्कमा देण्यास पैसेच नव्हते. यामुळे गेल्या काही महिन्यापासून ठेवीदारांना आज पैसे देतो, उद्या पैसे देतो असे बँकेकडून सांगण्यात येत होते.

ठेवीदार पोहचले पोलिस ठाण्यात

तारीख पे तारीख मिळत असल्यामुळे अखेर ठेवीदारांच्या तक्रारीवरून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटच्या अध्यक्षा अनिता बबन शिंदे, बबन शिंदे, मनीष शिंदे, अश्विनी सुनील वांढरे व बँकेचे सर्व कार्यकारी मंडळावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसात आता गुन्हा नोंद झाला आहे. मात्र ठेवीदारांचे पैसे आता कशाप्रकारे आणि कधी मिळणार? हा प्रश्न मात्र आता ठेवीदारांपुढे उभा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे प्रवासात २५ मिनिटे वाचणार, मिसिंग लिंकचं काम पूर्ण, या दिवशी होणार सुरू

कामाची बातमी! मुंबईहून पुणे अन् कोल्हापूरसाठी विशेष रेल्वे, वाचा वेळापत्रक अन् थांबे

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये महापौर पद भाजपकडेच राहण्याची शक्यता

Pune Accident : दीड वर्षापूर्वी लग्न, आता अपघातात मृत्यू, पुण्यात एसटी बसने उड्डाणपूलावर राजाला उडवले

IND vs NZ: श्रेयस की इशान, तिलक वर्माच्या जागी कोण खेळणार? सूर्याने २ वाक्यात विषय संपवला अन् कारणही सांगितलं

SCROLL FOR NEXT