Uddhav Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Beed Politics: बीडमध्ये राजकीय उलथापालथ, ठाकरेंचा महायुतीला दणका; बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Shivsena Thackeray Group: बीडमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. शिवसेना ठाकरे गटाची बीडमध्ये ताकद वाढली आहे. बड्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

Priya More

Summary -

  • बीडमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला

  • कुंडलिक खांडे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला

  • त्यांच्यासोबत अनेक सरपंच आणि कार्यकर्त्यांनीही ठाकरे गटात प्रवेश केला

  • उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत करत विरोधकांवर निशाणा साधला

बीडच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपू्र्वी बीडमध्ये शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. शिंदे गटातून हकालपट्टी करण्यात आलेल्या कुंडलिक खांडे यांनी आज शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी धनुष्यबाण हाती घेतलं. त्यांच्यासोबत अनेक सरपंच आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पंचायत समिती सदस्य आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राहिलेल्या कुंडलिक खांडे यांनी आज शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. वर्षभरापूर्वी शिवसेना शिंदे गट बीड जिल्हाप्रमुख पदावरून खांडेंची हकालपट्टी करण्यात आली होती. खांडेंनी बीडमध्ये महायुतीविरोधात मतदान फिरवल्याचे उघड झाले होते त्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.

कुंडलिक खांडे हे पंचायत समितीचे सदस्य होते. ते शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षामध्ये जिल्हाप्रमुख पदावर होते. पण पक्षाविरोधात काम केल्यामुळे दोन्ही पक्षांतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी पंकजा मुंडे यांच्याविरोधात काम केले होते. महायुतीविरोधात काम केल्यामुळे त्यांना शिंदे गटातून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी स्वराज्य पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांना फक्त १९०० मतं पडली होती. निवडणुकीनंतर वर्षभर ते राजकारणात सक्रीय नव्हते. आता त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.

कुंडलिक खांडे यांच्या पक्षप्रवेशादरम्यान उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी त्यांनी सांगितले की, 'चूक झाली तर समजून घेऊ शकतो पण अपराध होता कामा नये. महाराष्ट्र आपला कोण याकडे पाहत आहे. राज्यात सध्या तीन साप प्रत्येकाच्या तोंडात शेपूट टाकत आहेत. म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकाला गिळायला बसले आहेत. लढाई ही फक्त आपल्या शिवसेनेपुरती राहिली नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. अडीच वर्षे मी मुख्यमंत्री होतो कुणी काय केले आणि काय नाही केले हे तुम्ही सांगून शकता. शेतकऱ्यांना भेटलो तेव्हा ते म्हणाले साहेब तुम्ही जी कर्जमाफी केली ती कुणीच करू शकत नाही. जनतेचे भलं करण्यासाठी आम्हाला सत्ता पाहिजे. बीड जिल्ह्याची पूर्णपणे विल्हेवाट लागली आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Blast: 'जैश'च्या महिला विंगची चीफ निघाली डॉ. शाहीन, कारमध्ये ठेवायची AK-47, दिल्ली स्फोटापूर्वी अटक

Gkowing Skin Face Wash: ग्लोईंग स्किनसाठी सामान्य फेसवॉश नाही; २% सॅलिसिलिक अ‍ॅसिड असलेले फेसवॉश आहेत बेस्ट

Maharashtra Live News Update : यवतमाळमध्ये धडकला ठेवीदारांचा मोर्चा

अन्याय आणि जुलूम यातूनच दहशतवाद जन्माला येतो, दिल्ली स्फोटावर अबू आझमींची प्रतिक्रिया|VIDEO

Pakistan Blast : पाकिस्तानमध्ये 'दिल्ली' पॅटर्न, हायकोर्टाजवळ कारमध्ये स्फोट; मृतांचा आकडा वाढला

SCROLL FOR NEXT