Local Body Elections : महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; वारे बदलले, शिंदेंच्या शिवसेनेचा शिर्डीत भाजप-राष्ट्रवादीला थेट इशारा

Shirdi Nagarpalika Election : महापालिका, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून, काही ठिकाणी महायुती फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शिर्डीत महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेने थेट भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.
Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis, Mahayuti
Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis, Mahayuti Saam tv
Published On
Summary
  • आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं

  • महायुती फुटीच्या उंबरठ्यावर

  • शिर्डीत शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक

  • सन्मानजनक जागावाटप झालं नाही तर स्वबळावर लढण्याचा इशारा

सचिन बनसोडे, शिर्डी | साम टीव्ही

महापालिका, नगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे. राज्यातील सत्ताधारी महायुतीनं निवडणुकांसाठी महायुतीची अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, स्थानिक पातळ्यांवर महायुती फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र दिसून येत आहे.

आगामी काही दिवसांत महाराष्ट्रातील बहुप्रतीक्षीत महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुका डिसेंबर, जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे, असे राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यादृष्टीने राजकीय पक्षांनी तयारी देखील सुरू केली आहे. याशिवाय अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्थानिक पातळ्यांवर उमेदवारी घोषित केली असून, प्रचारालाही सुरुवात केली आहे. पण काही ठिकाणी अद्याप 'तुमचं आमचं जमेना' अशीच काहीशी अवस्था आहे. शिर्डी नगरपालिकेतही महायुती होणार नसल्याचे दिसून येत आहे. तिथं महायुती फुटू शकते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत आज, शुक्रवारी शिंदेंच्या शिवसेनेची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नगरपालिकेतील जागावाटपावरून शिंदे गटानं महायुतीला थेट इशारा दिला आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत किमान १० जागा देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.

शिर्डीत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत पार पडली. शिर्डी नगरपरिषदेच्या २३ पैकी किमान १० जागा मिळाव्यात; अन्यथा शिवसेना स्वबळावर निवडणुका लढवेल, असा इशारा देण्यात आला आहे. माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी कार्यकर्त्यांना संघटीत राहण्याचे आणि स्थानिक पातळीवर मतदारांशी संपर्क वाढवण्याचे आवाहन केले. दरम्यान, शिंदे गटाची कोअर कमिटी लवकरच अहिल्यानगर जिल्ह्यातील महायुतीचे प्रमुख नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन जागावाटपाबाबत चर्चा करणार आहे.

Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis, Mahayuti
Maharashtra Politics: नाशिकमध्ये मविआला खिंडार! अनेक बड्या नेत्यांनी सोडली साथ, भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'ला यश

महायुतीत जागावाटपावरून तणाव वाढण्याची शक्यता असताना शिर्डीतील ही हालचाल आगामी निवडणुकीच्या समीकरणांवर परिणाम करू शकते. त्यामुळे शिर्डी नगरपरिषद निवडणुकीत महायुतीत सन्मानजनक जागा वाटप होते की शिंदेंची शिवसेना स्वबळावर निवडणुकांना सामोरे जाते, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis, Mahayuti
Maharashtra Politics: 'लाचारी'वरून 'राज'कारण तापलं! एकनाथ शिंदेंचा नेता ठाकरेंवर भडकला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com