Beed News Saamtv
महाराष्ट्र

Beed News: बीडमधील बड्या नेत्याचा ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'; ५०० गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईला रवाना, शिंदे गटात करणार प्रवेश

Beed News: बीडमध्ये ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या प्रवेशासाठी बीडमधून ५०० गाड्यांचा ताफा मुंबईकडे रवाना झाल्या आहेत.

विनोद जिरे

Beed Political News:

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जवळ येत असतानाच ठाकरे गटामध्ये गळती सुरूच आहे. बीडमध्ये ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत. आज शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या प्रवेशासाठी बीडमधून ५०० गाड्यांचा ताफा मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. (Latest Marathi News)

गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये (Beed) ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीनाट्य सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला बीडमधून मोठं खिंडार पडले आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप हे आपल्या शेकडो पदाधिकारी आणि हजारो शिवसैनिकांसह शिवसेना शिंदे गटामध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत.

आज रात्री (९, जानेवारी) 8 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा बंगल्यावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याल बीडमधून तब्बल 500 गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. बीड ते मुंबई या रॅलीमध्ये हजारो शिवसैनिक सहभागी झाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, बीड जिल्ह्यातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटांमध्ये मोठी अस्वस्थता असल्याचं मागच्या काही दिवसात जाणवत आहे. मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सुषमा अंधारे यांच्यावर आरोप करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून, शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत.

याआधी तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिलेले व्यकटेश शिंदे, राजा पांडे, संतोष चौधरी, विजय राठोड, कृष्णा सुरवसे, मोहन राजमाने, नागेश मुरकुटे यासह ५३ प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कार्यकर्त्यांवर होणाऱ्या संभाव्य खोट्या गुन्ह्यांना उत्तर देण्यासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या नेत्याची 'अनोखी शक्कल'

Kuchipudi Dance History: 'या' गावाच्या नावावरून कुचीपुडी नृत्याचे नाव पडले, जाणून घ्या त्याचा इतिहास

Raj-Uddhav Thackeray: ठाकरे बंधू पुन्हा एकत्र, भाऊबीज साजरी करण्यासाठी जयजयवंती यांच्या घरी पोहचले; पाहा VIDEO

Parineeti Chopra Birthday: राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा कोण जास्त श्रीमंत? जाणून घ्या अभिनेत्रीची नेटवर्थ

EPFO 5 Rule News : आता पेन्शन प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल, EPFO चे हे ५ नवे नियम माहिती आहेत का ?

SCROLL FOR NEXT